अर्जदाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वेल्डर, ऑटो-इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक वा टर्नर यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी आणि ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली एनएमडीसीची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट जनरल मॅनेजर पर्सोनेल, एनएमडीसी लिमिटेड, बीआयओएम बचेली कॉम्प्लेक्स, पोस्ट बचेली, जि. दक्षिण बस्तर- दांतेवाडा, छत्तीसगड ४९४५५३ या पत्त्यावर १ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.
इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या ६ जागा
अर्जदार पशुवैद्यकशास्त्र विषयातील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सीनिअर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (पर्सोनेल), डायरेक्टोरेट जनरल- आयटीबीपी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ब्लॉक- २, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर २ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.
सीएसआयआर- हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजीमध्ये सीनिअर टेक्निकल ऑफिसरच्या ६ जागा
अर्जदार विज्ञान विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. वयोमर्यादा ३८ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ मे ६ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ हिमालयन रिसोर्स टेक्नॉलॉजीची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सीएसआयआर- आयएचबीटी, पालमपूर १७६०६१ (हिमाचल प्रदेश) या पत्त्यावर २ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.
भारतीय हवाई दलात महिला अभियंत्यांना विशेष संधी
अर्जदार महिलांनी अभियांत्रिकी पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २३ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय हवाई दलाची जाहिरात पाहावी अथवा हवाई दलाच्या http://www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०१४.
भारतीय वायुदलात अभियंत्यांसाठी संधी
अर्जदारांनी अभियांत्रिकीमधील पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा पात्र असावेत. वयोमर्यादा २३ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी अथवा वायुदलाच्या http://www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज ३ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.
सैन्यदलात डॉक्टर्ससाठी ३०० जागा
अर्जदारांनी इंडियन मेडिकल काऊन्सिलद्वारा मान्यताप्राप्त पदवी प्राप्त केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ४५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० जूनच्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाच्या वैद्यक विभागाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.amcsscentry.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३ जुलै २०१४ पर्यंत अर्ज करावेत.
चंदिगढ प्रशासनात सिव्हिल इंजिनीअर्ससाठी १५ जागा
अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत. वयोमर्यादा ३७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०१४.
भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडसाठी सायन्टिफिक असिस्टंटच्या २० जागा
उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रमेंटेशन वा कॉम्प्युटर सायन्समधील पदविका परीक्षा कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नाभिकीय विद्युत निगम लि.ची जाहिरात पाहावी अथवा निगमच्या http://www.bhavinionline.in, http://www.bhavini.co.in किंवा http://www.bhavini.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै २०१४.
‘इस्रो’मध्ये टेक्निकल असिस्टंटच्या ५ जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम कमीत कमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेला असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सीनिअर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, मास्टर कंट्रोल फॅसिलिटी, सलागेय रोड, हासन (कर्नाटक) ५७३२०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०१४.
संसद कार्यालयात भाषाविषयक तज्ज्ञांच्या ९ जागा
अर्जदार प्रादेशिक भाषा व इंग्रजीसह पदवीधर आणि इंग्रजीचे पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. भाषांतराचे काम करण्याचे अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येतात. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ मे – ६ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली संसद कार्यालयाची जाहिरात पाहावी अथवा संसदेच्या http://www.loksabha.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०१४.