अर्जदारांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे विषय घेऊन किमान
७० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोगट १७ ते १९.५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ जून २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या http://www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २३ जून २०१४पर्यंत अर्ज करावेत.
रिझव्र्ह बँकेत अधिकाऱ्यांसाठी ११७ जागा
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी कमीत कमी ६० टक्केगुणांसह अथवा पदव्युत्तर पदवी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा एमबीए, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाऊंटन्सी यांसारखी पात्रता पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
३१ मे ते ६ जून २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा रिझव्र्ह बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०१४.

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संशोधकांच्या १३ जागा
अर्जदारांनी अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी तसेच त्यांना संबंधित कामाचा अनुभव असणे अपेक्षित आहे. पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ मे ६ जून २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी अथवा ‘डीआरडीओ’च्या http//rac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर
२५ जून २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

‘ओएनजीसी’मध्ये ज्युनिअर असिस्टंट टेक्निशियन (केमिस्ट्री)च्या १९ जागा
अर्जदारांनी बी.एस्सी.- रसायनशास्त्र पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ जून २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली ऑइल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि.ची जाहिरात पाहावी अथवा ‘ओएनजीसी’च्या http://www.ongcindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जून २०१४.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये सीनिअर इंजिनीअर्स (इलेक्ट्रिकल्स)च्या १० जागा
अर्जदारांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीत कमी ६० टक्के  गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. पदव्युत्तर पात्रताधारकांना प्राधान्य. वयोमर्यादा ३६ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ मे, ६ जून २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.powergridindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २७ जून २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

कर्मचारी निवड आयोगाच्या स्टेनोग्राफर्स परीक्षा- २०१४ अंतर्गत ५३४ जागा
 अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी लघु-लेखनाची ८० ते १०० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
३१ मे, ६ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी. राज्यातील उमेदवारांनी आपले अर्ज रीजनल डायरेक्टर (वेस्टर्न रीजन), स्टाफ सिलेक्शन कमिशन, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २७ जून २०१४.

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये सुरक्षा रक्षकाच्या २४ जागा  
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व निवृत्त सैनिक असावेत. वयोमर्यादा ४० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ मे, १३ जून २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली भारत इलेक्ट्रॉनिकची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी मॅनेजर (एचआर/ सेंट्रल), भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, जलाल्ली पोस्ट, बंगळुरू ५६००१३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ जून २०१४.

प्रादेशिक सेवेत अधिकाऱ्यांसाठी संधी
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर, शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. त्यांना शासकीय, निमशासकीय सेवेतील कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा ४२ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ मे १३ जून २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली प्रादेशिक सेनेची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.indianarmy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. राज्यातील उमेदवारांनी आपले अर्ज कमांडर, टीए हेडक्वार्टर्स, सदर्न कमांड, पुणे- ४११००१ या पत्त्यावर ३० जून २०१४ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनीत प्रशिक्षार्थी इंजिनीअर्सच्या १२५ जागा
अर्जदार पदवीधर इंजिनीअर्स असायला हवेत तसेच त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ मे ते ६ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल अॅल्युमिनियम कंपनीची जाहिरात पाहावी अथवा नाल्कोच्या http://www.nalcoindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१४.        

Story img Loader