मरिन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी, कोचीन येथे ज्युनिअर टेक्निकल ऑफिसरच्या ५ जागा
अर्जदारांनी रसायनशास्त्र, बायोकेमिस्ट्री, जीव-रसायनशास्त्र, मत्स्योत्पादन, मत्स्य-प्रक्रिया यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी मरिन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीच्या http://www.mpeda.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक कागदपत्रांसह असणारे अर्ज दि सेक्रेटरी, मरिन प्रॉडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी, एमपीईडीए हाऊस, पेनमपल्ली अॅव्हेन्यू, पेनमपल्ली नगर, कोचीन ६८२०३६ या पत्त्यावर १७ जून २०१४ पर्यंत पाठवावेत.
राज्य सरकारच्या वित्त विभागात लेखा लिपिकांच्या ३२६ जागा
अर्जदारांनी वाणिज्य विषयासह बारावीची परीक्षा किंवा वाणिज्य विषयातील पदवी अथवा गणित-सांख्यिकी विषयांसह पदवी परीक्षा कमीतकमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३३ वर्षे. अर्जाचा नमुना, इतर माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली राज्य सरकारच्या वित्त विभागाची जाहिरात पाहावी. अथवा वित्त विभागाच्या http://mahakosh.maharashtra.gov.in/ http://mahalfa.maharashtra.gov.in Employee career Recruitment या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून २०१४.
सैन्यदलात अभियंत्यांसाठी ८० जागा
अर्जदारांनी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, संगणकशास्त्र, आर्किटेक्चर, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीअरिंग विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी अथवा या परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०१४.
सैन्यदलात पदव्युत्तर शिक्षकांच्या २० जागा
उमेदवार इंग्रजी, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, संगणक विज्ञान, चिनी, तिबेटी, पारसी, अरेबिक यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या शिक्षण विभागाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०१४.
‘गेल’मध्ये अभियंत्यांसाठी ३० जागा
उमेदवारांनी केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीतकमी ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा कमीतकमी एक वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या २४ ते ३० मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘गेल’ची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सीनिअर मॅनेजर (एचआरडी), ‘गेल’ (इंडिया) लिमिटेड, गेल भवन, १६, भिकाजी कामा रोड, आर. के. पुरम, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १९ जून २०१४.
हिंदुस्थान पेपर कॉर्पोरेशनमध्ये शिफ्ट सुपरिंटेंडेंट (केमिकल)च्या ४ जागा
उमेदवारांनी केमिकल इंजिनीअरिंग वा पल्प अँड पेपर टेक्नॉलॉजीमध्ये बीई/बीटेक्. पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असायला
हवा. वयोमर्यादा ३५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ मे ते ६ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली हिंदुस्थान पेपर कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.hindpaper.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे
भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज हिंदुस्थान पेपर कॉर्पोरेशन, ७५- सी, पार्क स्ट्रीट, कोलकाता- ७०००१६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जून २०१४.
रिझव्र्ह बँकेत अधिकाऱ्यांसाठी ११७ जागा
अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी कमीतकमी ६० टक्के गुणांसह अथवा पदव्युत्तर पात्रता ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी किंवा एमबीए, सीए, आयसीडब्ल्यूए यांसारखी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३१ मे ते ६ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०१४.