अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी भारतीय कंटेनर निगम लिमिटेडच्या http://www.concorindia.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज सीनिअर जनरल मॅनेजर (एचआर) कंटेनर कॉर्पोरेशन निगम लि., कॅन्कॉर भवन,
सी-३, मथुरा रोड, नवी दिल्ली ११००७६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
४ जून २०१४.
संरक्षण उत्पादन विभागात पुणे येथे टेक्निशियन्सच्या ६ जागा
अर्जदार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण उत्पादन विभाग- पुणेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज ‘दि कंट्रोलर ऑफ क्वॉलिटी अॅश्युरन्स’ (इंजिनीअरिंग इक्विपमेंट), औंध कँप, पुणे ४११०२७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची
तारीख ६ जून २०१४.
मंगलोर रिफायनरीजमध्ये कुशल कामगारांसाठी ९ जागा
अर्जदार केमिकल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत आणि त्यांना संबंधित कामाचा सुमारे पाच वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली मंगलोर रिफायनरीजची जाहिरात पाहावी अथवा मंगलोर रिफायनरीजच्या http://www.mrpl.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जून २०१४.
सेंट्रल एएफव्ही डेपो- खडकी- पुणे येथे कामगारांसाठी ६ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल एएफव्ही डेपो- खडकी, पुणेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि कमांडंट, सेंट्रल एएफव्ही डेपो, खडकी, पुणे ४११००३ पिन कोड ९०८७९८ C/o 56 एपीओ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ जून २०१४.
नौदल शिपयार्ड, कारवार येथे प्रशिक्षार्थीच्या ४७ जागा
अर्जदारांनी शालान्त परीक्षा ५० टक्के गुणांसह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची फिटर, मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वेल्डर यांसारखी पात्रता ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २१ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल शिपयार्ड-कारवारची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि ऑफिसर, इन्चार्ज, डॉकयार्ड अॅप्रेन्टिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार ५८१३०८ (कर्नाटक) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ जून २०१४.
नेव्हल आर्मामेंट डेपो- मुंबई येथे कुशल कामगारांच्या १७ जागा
 अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत आणि त्यांनी फिटर जनरल मेकॅनिक अथवा इलेक्ट्रॉनिक्सची पात्रता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नेव्हल आर्मामेंट डेपोची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले तपशिलवार अर्ज साध्या टपालाने जीपीओ पोस्ट बॉक्स नं. ३६१, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जून २०१४.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा