अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत.
या संदर्भात अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या http://www.unishivaji.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर-४१६००४ या पत्त्यावर ३० जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात ओव्हरसीअर्सच्या ५९ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोगट २० ते २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४ च्या अंकात झालेली इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल (ईस्टर्न), फ्रंटियर एचक्यू, आयटीबी पोलीस, शीला कॉम्प्लेक्स, विधानसभा मार्ग, रेडिओ स्टेशनजवळ, हजरतगंज, लखनऊ- २२६००१ या पत्त्यावर ३१ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल- नवी दिल्ली येथे खासगी सचिवांच्या ११ जागा
अर्जदार पदवीधर असावेत आणि लघुलेखनाची १०० शब्द प्रतिमिनिट तर टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता असावी. कायदा विषयातील पदवीधरांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा ४० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल’ची जाहिरात पाहावी अथवा ट्रायब्युनलच्या http://www.greentribunal.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज रजिस्ट्रार जनरल, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, फरिदकोट हाऊस, कॉपर्निकस मार्ग, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर ३१ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.

तटरक्षक दलात दहावी उत्तीर्णासाठी संधी
अर्जदारांनी दहावीची परीक्षा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोगट १८ ते २२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली तटरक्षक दलाची जाहिरात पाहावी अथवा तटरक्षक दलाच्या http://www.joinindiancoastguard.gov.i या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि रिक्रूटमेंट ऑफिसर, इंडियन कोस्ट गार्ड, पोस्ट बॉक्स नं. २९१०५, प्रभादेवी पोस्ट ऑफिस, वरळी, मुंबई- ४०००३० या पत्त्यावर साध्या टपालाने ३१ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये चालकांच्या १२०३ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अवजड वाहन चालविण्याचा परवानाधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जून ते ४ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा http://www.cisf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
महाराष्ट्रातील उमेदवारांनी आपले अर्ज डीआयजी-सीआयएसएफ वेस्ट झोन, सीआयएसएफ कॉम्प्लेक्स, सेक्टर- ३५, खारघर, नवी मुंबई- ४१०२१० या पत्त्यावर २ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामध्ये असिस्टंट कॉस्ट अकाऊंट ऑफिसर्सच्या १४ जागा
अर्जदार बीकॉम पदवीधर असावेत. त्यांना संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ जुलै २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात सब इन्स्पेक्टरच्या (टेलिकॉम) ३ जागा
अर्जदारांनी गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांसह बीएस्सी किंवा संगणक विज्ञान वा अभियांत्रिकी विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज, आवश्यक त्या कागदपत्रांसह दि इन्स्पेक्टर जनरल (इस्टर्न) फ्रंटियर हेडक्वॉर्टर्स, आयटीबी पोलीस कॉम्प्लेक्स, विधानसभा मार्ग, रेडिओ स्टेशनजवळ, हजरत गंज, लखनऊ- २२६००१ (उ. प्र.) या पत्त्यावर २१ जुलै २०१४ पर्यंत पाठवावेत.

राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये संरक्षण दलामध्ये ३७५ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोगट १५ ते १८ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर २१ जुलै २०१४ पर्यंत अर्ज करावेत.    

Story img Loader