या योजनेअंतर्गत राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा निवड परीक्षा प्रवेश मार्गदर्शन प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ५० विद्यार्थी उमेदवारांची निवड करण्यात येईल.
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर वा पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असायला हवे.
राज्य लोकसेवा आयोग परीक्षांसाठी उमेदवारांचे वय ३८ वर्षे तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पात्रता परीक्षांसाठी ३५ वर्षांहून अधिक नसावे.
योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी पुणे मनपाच्या ६६६.स्र्४ल्लीू१स्र्१ं३्रल्ल.१ॠ या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा दूरध्वनी क्र. ०२०-२४४५९०८४ वर संपर्क साधावा.
विहित नमुन्यात संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पुणे महानगरपालिका, न. वि. गाडगीळ प्रशाला, शनिवार पेठ, पुणे ४११०३० येथे जमा करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१३.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा