० सीमा सुरक्षा दलात साहाय्यक निरीक्षक दळणवळण व संवाद पदाच्या २६९ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी रेडिओ, इलेक्ट्रिॉनिक्स वा टेलिकम्युनिकेशन विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेट न्यूज’च्या ७ ते १३ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा सीमा सुरक्षा दलाच्या http://www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २०१४.
० ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षार्थीच्या संधी
अर्जदारांनी कॅटरिंग मॅनेजमेंटमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.drdge-india.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील अर्ज मॅनेजर- एचआर (एफएस) ट्र्रेिडग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ड्रेज हाऊस, पोर्ट एरिया, विशाखापट्टणम् ५३० ००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ जुलै २०१४.
० सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीममध्ये असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या
४० जागा
अर्जदारांनी माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान यांसारख्या विषयातील पदवी परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ जून २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीमची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या http://crisrecruitment2014.org.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१४.  

Story img Loader