भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सिव्हिल इंजिनीअर्ससाठी ७ जागा
अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा एक वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या http://www.bel-india या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २० ऑगस्ट २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये क्राफ्ट्समन- इलेक्ट्रिशियनच्या ८ जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांच्याजवळ इलेक्ट्रिशियनचा परवाना असावा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत पेट्रोलियमची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज दि सीनिअर मॅनेजर (ईआर), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई रिफायनरी, माहुल, मुंबई- ४०००७४ या पत्त्यावर २३ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

‘गेल’ इंडिया लिमिटेडमध्ये सीनिअर इंजिनीअर (केमिकल-पीसी ऑपरेशन्स)च्या २० जागा
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर तपशिलासाठी ‘गेल’ इंडिया लिमिटेडच्या http://www.gailonline.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह गेल (इंडिया) लिमिटेड, ‘गेल’ भवन, १६, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर २५ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

राज्य सरकार- राजीव गांधी सशक्तीकरण अभियानात गट-अभियंत्यांच्या ३५१ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, कामाचे स्वरूप, निवड प्रक्रिया यासारख्या अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे २५ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर इंजिनीअरच्या (सिव्हिल) १८ जागा
अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा अनुभव असावा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जून ते ४ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर- एचआर- १, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पाचवा मजला, प्रगती मैदान- मेट्रो स्टेशन बिल्डिंग कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर २६ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.     

Story img Loader