इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलात हिंदी अनुवादक-सहनिरीक्षकांच्या ५ जागा
उमेदवारांनी हिंदी वा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. पदवी परीक्षेला हिंदूी आणि इंग्रजी हे विषय घेतलेले असावेत किंवा इंग्रजी-हिंदी भाषांतराची पदविका पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
१९ ते २५ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज इन्स्पेक्टर जनरल (ईस्टर्न) फ्रंटियर, आयटीबी पोलीस, शीला कॉम्प्लेक्स, विधानसभा मार्ग, आकाशवाणीजवळ, हजरतगंज, लखनऊ (उप्र) २२६००१ या पत्त्यावर १९ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.
कर्मचारी निवड आयोगाची बारावी उत्तीर्णासाठी निवड परीक्षा- २०१४ अंतर्गत १९९७ जागा
अर्जदारांनी १०+२ अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संगणकाचे ज्ञान असावे. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
संगणकीय पद्धतीने कर्मचारी निवड आयोगाच्या http://ssc.online.nic.in या संकेतस्थळावर १९ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.
इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात पशुवैद्यक सह-निरीक्षकांच्या ५५ जागा
अर्जदार पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधर, शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत आणि त्यांना संबंधित कामाचा अनुभव असायला हवा. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ जुलै २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (एस्टॅब्लिशमेंट), डायरेक्टर जनरल- आयटीबी पोलीस, ब्लॉक- २, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली ११० ००३ या पत्त्यावर २० ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अॅण्ड इन्फर्मेशन रिसोर्सेस, नवी दिल्ली येथे संशोधकांच्या ४ जागा
अर्जदारांनी एसएससी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ जुलै – १ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सीएसआयआर नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अॅण्ड इन्फर्मेशन रिसोर्सेसची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.niscair.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अॅण्ड इन्फर्मेशन रिसोर्सेस, डॉ. के. एस. कृष्णन मार्ग, पूसा गेट, नवी दिल्ली ११००६७ या पत्त्यावर २० ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.
‘सीएसआयआर’ अंतर्गत नॅशनल केमिकल लेबॉरेटरी, पुणे येथे संशोधक/ वरिष्ठ संशोधकांच्या १२ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता, इतर माहितीसाठी नॅशनल केमिकल लेबॉरेटरीच्या http://jobs.ncl.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. वयोगट ३२ ते ३७ वर्षे. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख
२० ऑगस्ट २०१४.
केंद्र सरकारच्या रोजगार व प्रशिक्षण मंत्रालयात ज्युनिअर कन्सल्टंटच्या ४६ जागा
उमेदवारांनी इंजिनीअरिंगमधील पदवी घेतलेली असावी. त्यांना शिक्षण-प्रशिक्षणविषयक कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय रोजगार व प्रशिक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डायरेक्टोरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट अॅण्ड ट्रेनिंग, रूम नं. ८, श्रमशक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर
२३ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.
उत्तर-मध्य रेल्वेत स्काउट व गाइड्ससाठी ८ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी स्काउट व गाइड्समध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी २६ जुलै – १ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली उत्तर-मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज चेअरमन, रेल्वे रिक्रुटमेंट सेल, नॉर्थ सेंट्रल रेल्वे, नवाब युसूफ रोड, वाल्मीकी चौराहा, अलाहाबाद २११००१ या पत्त्यावर २५ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.
मँगनीज ओर इंडिया, नागपूर येथे माइन सुपरवायझरच्या ७ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी माइन फोरमनविषयक पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी मँगनीज ओर इंडियाच्या http://www.moil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले अर्ज जनरल मॅनेजर (पर्सोनेल), मॉईल लिमिटेड, मॉईल भवन, १ – ए, काटोल रोड, नागपूर- ४४००१३ या पत्त्यावर २५ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.