अर्जदारांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. एमबीए वा पदव्युत्तर पात्रताधारकांना प्राधान्य दिले जाईल.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली रुरल इलेक्ट्रिफिकेशनची जाहिरात पाहावी अथवा आईसीच्या http://www.recindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये चार्टर्ड अकाउंटंटच्या २५ जागा
अर्जदार पात्रताधारक चार्टर्ड अकाउंटंट असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या ww.hindustanpetroleum.com अथवा http://www.hpclcareers.com या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १६ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल/ ट्रेड्समनच्या ९८५ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २३ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी. महाराष्ट्रातील उमेदवारांनी डीआयजी/ सीआयएसएफ- वेस्ट झोन, सीआयएसएफ कॉम्प्लेक्स, सेक्टर-३५, खारघर, नवी मुंबई- ४१०२०१ या पत्त्यावर १६ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया व सहयोगी बँकेत प्रोबेशनरी अधिकाऱ्यांच्या २९८६ जागा  
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा स्टेट बँकेच्या http://www.sbi.co.in अथवा http://www.statebankofindia.com या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १८ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

एक्झिम बँकेत डेप्युटी मॅनेजर्सच्या ८ जागा
अर्जदारांनी हिंदी, एचआर, व्यवस्थापन, कॉमर्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली एक्झिम बँकेची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज दि जनरल मॅनेजर-एचआरएम, एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, सेंटर वन बिल्डिंग, २१ वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉम्प्लेक्स, कफ परेड, मुंबई- ४०० ००५ या पत्त्यावर १९ सप्टेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

सैन्य दलात कायदा पदवीधरांसाठी १० जागा
अर्जदारांनी कायदा विषयातील पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १९ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

कृषी वैज्ञानिक निवड मंडळात उपसंचालक राजभाषा पदाच्या ११ जागा
उमेदवारांनी इंग्रजी वा हिंदीतील पदव्युत्तर पदवी अथवा हिंदी आणि इंग्रजीसह पदवी व हिंदी-इंग्रजी भाषांतरविषयक पदविका उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी कृषी-वैज्ञानिक निवड मंडळाच्या http://www.asrb.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २२ सप्टेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.