एनटीपीसीमध्ये फायनान्स एक्झिक्युटिव्हज्च्या १५ जागा
अर्जदारांनी चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अकाऊंटंट ही पात्रता प्राप्त केलेली असावी. त्यांना संबंधित विषयातील कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ४२ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘एनटीपीसी’ची जाहिरात पाहावी अथवा ‘एनटीपीसी’च्या http://www.ntpccareers.net या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १६ मार्च २०१५ पर्यंत अर्ज करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेवी वॉटर बोर्डात प्रशिक्षणार्थी पदविकाधारक अभियंत्यांसाठी ६२ जागा
उमेदवार केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक अथवी बी.एस्सी. पात्रताधारक असावेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी किमान ६० टक्के असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली हेवी वॉटर बोर्डाची जाहिरात पाहावी अथवा बोर्डाच्या http://www.hwb.gov.in अथवा hwb.mahaonline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर १६ मार्च २०१५ पर्यंत अर्ज करावा.

गेल (इंडिया)मध्ये सीनियर ऑफिसर (एफ अ‍ॅण्ड ए)च्या ९ जागा
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी गेल (इंडिया) लिमिटेडच्या http://www.gailonline.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज गेल (इंडिया) लि., ‘गेल’ भवन, १६, भिकाजी कामा पथ, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर १६ मार्च २०१५ पर्यंत अर्ज करावा.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात ड्रग इन्स्पेक्टरच्या १४७ जागा
उमेदवार फार्मसी वा फार्मास्युटिकल सायन्सेस विभागातील पदवीधर असावेत. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा दीड वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १९ मार्च २०१५ पर्यंत अर्ज करावा.

सेंट्रल संरक्षण डेपो- देहू रोड येथे सुपरिंटेंडंट (स्टोर्स) च्या ६ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर वा अभियांत्रिकीमधील पदविकाधारक असावेत. त्यांनी मटेरियल मॅनेजमेंटमधील पदविका पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली सेंट्रल संरक्षण डेपोची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडंट, सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, देहू रोड, पुणे- ४१२१०१ या पत्त्यावर २० मार्च २०१५ पर्यंत पाठवावेत.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये एक्झिक्युटिव्हज् ट्रेनीजच्या ११० जागा
उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल वा इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंग अथवा इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड फायर सेफ्टीमधील पदवी परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ फेब्रुवारी – ६ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.npcilonline.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २० मार्च २०१५ पर्यंत अर्ज करावा.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सव्‍‌र्हिस व इंडियन स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिस स्पर्धा परीक्षा- २०१५ अंतर्गत ६१ जागा  
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.gov.in  या संकेतस्थळावर २० मार्च २०१५ पर्यंत अर्ज करावा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunity
Show comments