navi-sandhi2नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिक्समध्ये सायंटिफिक असिस्टंटच्या ६ जागा
उमेदवारांनी गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांसह बीएस्सी अथवा माइनिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक वा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी १४ ते २० मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिक्सची जाहिरात पाहावी अथवा http://www.nirm.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मेकॅनिक्स, चॅम्पियन रिफ्स, कोलार गोल्ड फिल्ड्स ५६३११७ या पत्त्यावर ३० एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.

भारतीय वायुसेनेत कनिष्ठ कारकुनांच्या ४ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण, इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट, तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट अशी पात्रता प्राप्त केलेले असावेत तसेच ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ मार्च २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज एअर ऑफिसर कमांडिंग, एअरफोर्स स्टेशन- आग्रा, आग्रा (उ.प्र.) या पत्त्यावर ३० एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.

बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या १३ जागा
उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते २७ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली बँक नोट पेपर मिल इ. प्रा. लि.ची जाहिरात पाहावी अथवा मिलच्या http://www.bnpmindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३० एप्रिल २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

नौदलाच्या लॉजिस्टिक विभागात अधिकारपदाच्या संधी
नौदलाच्या इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवी व एमबीए पात्रता किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुन्यासाठी नौदलाच्या http://www.joinindiannavy.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज १ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

संरक्षण मंत्रालयात सिकंदराबाद येथे कनिष्ठ कारकुनांच्या १० जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण व टंकलेखनातील पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ४ ते १० एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील भरलेले अर्ज मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, एओसी रेकॉर्ड्स, त्रिमूलघेरी पोस्ट, सिकंदराबाद- १५ या पत्त्यावर १ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

एअरफोर्स रेकॉर्ड ऑफिस, नवी दिल्ली येथे कनिष्ठ कारकुनांच्या ७ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट, तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असायला हवेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली वायुदलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि एअर ऑफिसर कमांडिंग, एअरफोर्स रेकॉर्ड ऑफिस, सुब्रतो पार्क, नवी दिल्ली ११००१० या पत्त्यावर ३ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.

Story img Loader