उमेदवार बारीवी उत्तीर्ण असावेत. त्यांनी नर्सिगमधील पदविका किंवा बीएस्सी-नर्सिग पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ एप्रिल ते १ मे २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉपरेरेशनच्या http://www.npcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ‘डेप्युटी मॅनेजर (एचआरएम), न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशन, कक्रापार-गुजरात साइट, पोस्ट-अनुयला, ता. व्यारा, जि. वापी, गुजरात – ३९४६५१’ या पत्त्यावर १८ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.
नौदल गोदी- मुंबईत कुशल कामगारांच्या २९९ जागा
उमेदवार शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांनी इलेक्ट्रिकल फिटर, बॉयलर मेकर, इंजिन फिटर, प्लेटर, पॅटर्न मेकर, मिलराइट, रिगर, वेल्डर यांसारख्या तांत्रिक विषयातील प्रशिक्षण प्राप्त केलेले असावे.
वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ मे २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल गोदी- मुंबईची जाहिरात पाहावी अथवा http://www.godiwadabhartee.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २० मे २०१५ पर्यंत अर्ज करावेत.
नौदलात वादक नौसैनिक म्हणून संधी
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांना विविध वाद्ये वाजविण्याचे प्रावीण्य आणि अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २१ वर्षे.
अधिक माहितीसाठी नौदलाच्या http://www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २० मे २०१५ पर्यंत अर्ज करावेत.
इंडियन अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूट अंतर्गत तांत्रिक साहाय्यकांच्या २६ जागा
उमेदवारांनी कृषी, कृषी विज्ञान अथवा सामाजिक विज्ञान यांसारख्या विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.iari.res.iri या संकेतस्थळाला भेट द्यावी.
भरलेले अर्ज जॉइंट डायरेक्टर (अॅडमिन), इंडियन अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटय़ूट, पुसा, नवी दिल्ली- ११००१२ या पत्त्यावर २१ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.
अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी विशेष कौशल्य प्रशिक्षण
उमेदवारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा इंग्रजी या आवश्यक विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ एप्रिल ते १ मे २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली रोजगार व प्रशिक्षण संचालनालयाची जाहिरात पाहावी.
राज्यातील उमेदवारांनी संपूर्ण भरलेले अर्ज सब-रीजनल एम्प्लॉयमेंट ऑफिसर, कोचिंग कम गायडन्स सेंटर फॉर शेडय़ूल्ड कास्ट अँड शेडय़ूल्ड ट्राइब्ज, न्यू अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग क्र. १, पाचवा मजला, जिल्हा परिषद परिसर, सिव्हिल लाइन्स, नागपूर- ४४०००१ या पत्त्यावर २२ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.
संरक्षण मंत्रालयात ट्रेड्समनच्या ८३ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ मे २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज ऑफिसर कमांडिंग, २७ अॅम्युनेशन कंपनी पिन- ९०९४२६ c/o vw APO या पत्त्यावर २३ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.
सोलर एनर्जी कॉपरेरेशन ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर अकाउंटंटच्या ३ जागा
उमेदवारांनी बी.कॉम. अथवा एम. कॉम. पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा इंटर सीएसारखी पात्रता उत्तीर्ण असावेत. त्यांना अकाउंटस्विषयक कामाचा तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.
वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ एप्रिल ते १ मे २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली सोलर एनर्जी कॉपरेरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कॉपरेरेशनच्या http://www.seci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २४ मे २०१५ पर्यंत पाठवावेत.