रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया- मुंबई येथे संशोधन अधिकाऱ्यांच्या १७ जागा:
अर्जदारांनी अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पात्रता कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा संशोधनपर पीएच.डी. केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०१३.
विविध विमा कंपन्यांमध्ये साहाय्यकांच्या २६०० जागा :
उमेदवार पदवीधर असावेत अथवा त्यांनी बारावीची परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. संबंधित प्रादेशित भाषेचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्शुरन्स कंपनीची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.nationalinsuranceindia.comया संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०१३.
भाभा अणु-संशोधन केंद्रात टेक्निकल ऑफिसर्सच्या १० जागा :
उमेदवारांनी केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअिरगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भाभा अणु-संशोधन केंद्राची जाहिरात पाहावी अथवा ‘बीएआरसी’च्या http://www.barcrecruit.gov.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०१३.
केंद्रीय भू-जल सर्वेक्षण विभागात कॉम्प्रेसर ऑपरेटर्सच्या ४ जागा :
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांना कॉम्प्रेसर ऑपरेटिंगविषयक कामाचा सुमारे ३ वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय भूजल सर्वेक्षण विभागाची जाहिरात पाहावी.
तपशिलवार व संपूर्ण कागदपत्रांसह असणारे अर्ज मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस, लोकनायक जयप्रकाश भवन, डाक बंगला, पाटणा ८००००१ (बिहार) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जून २०१३.
दिल्ली पोलीस दलात असिस्टंट सब-इन्स्पेक्टर-रेडिओ टेक्निशियन्सच्या ४१ जागा :
अर्जदारांनी शालांत परीक्षा विज्ञान विषयांसह व त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वा कम्युनिकेशन्समधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. एक वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी दिल्ली पोलिसांच्या http://rieajmer.ac.in.या संकेतस्थळांना भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॉक्स क्र. ८०२०, नवी दिल्ली ११००३३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ जून २०१३.
सैन्य दलात इंजिनीअर्ससाठी ३० जागा :
उमेदवारांनी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाइल, एरॉनॉटिकल, संगणक विज्ञान, आर्किटेक्चर, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल, मेटॅलर्जी, इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ एप्रिल – ३ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindiauarmy.nic.in. या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०१३.
शैक्षणिक संधी
* रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन, अजमेर येथील बीएस्सी-बीएड अभ्यासक्रम.
संदर्भ- दूरध्वनी क्र. ०१४५-२९९०१४०.
www.igcar.gov.in..
संपर्क- अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर,
रिजनल इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन,
कॅप्टन डी. पी. चौधरी मार्ग,
अजमेर ३०५००४ (राजस्थान).
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ७ जून.
* इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटोमिक रिसर्च, कालपक्कम येथील संशोधन फेलोशिप.
संदर्भ- ६६६.्रॠूं१.ॠ५.्रल्ल.
संपर्क- इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च,
कालपक्कम् (तामिळनाडू).
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ७ जून.
* लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, तिरुअनंतपुरम् येथील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
संदर्भ- दूरध्वनी ०४७१-२४१८७१२. http://www.incpe.gov.in.
संपर्क- प्रिन्सिपॉल, लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ
फिजिकल एज्युकेशन, करियावोहम,
तिरुअनंतपुरम् ६९५५८१ (केरळ).
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ८ जून.
* महाराजा रणजितसिंह गायकवाड इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, वडोदरा येथील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
संदर्भ- http://www.msubaroda.ac.in अथवा http://www.msub.digitalunivercity.ac.
संपर्क- महाराजा रणजितसिंह गायकवाड
इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन,
वडोदरा (गुजरात)
अर्ज करण्याची शेवटची तारीख-१० जून.
* बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानी येथील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.
संदर्भ- http://www.bits.pilani.ac.in/ wipadmission.
संपर्क- डीन, बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स,
पिलानी ३३३०३१ (राजस्थान).
अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जून.
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, तंजावर येथील बीटेक, एमटेक व पीएच.डी अभ्यासक्रम.
संदर्भ- दूरध्वनी- ०४३६२-२२८१५५.www.iicpt.edu.in.
संपर्क- दि डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप टेक्नॉलॉजी,
पुडुकोहाई रोड, तंजावर ६१३००५.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० जून.
*एक्सएलआरआय- जमशेदपूर येथील आंत्रप्रेन्युअरशिप मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम.
संदर्भ- http://www.xlri.ac.in/edu.
संपर्क- ईडीसी ऑफिस, एक्सएलआरआय, जमशेटपूर.
* सिम्बॉयसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक, पुणे येथील एमएससी-अर्थशास्त्र अभ्यासक्रम
संदर्भ- दूरध्वनी ०२०-२५६७२५२०. http://www.sse.ac.in.
संपर्क- सिंबॉयसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक, सेनापती बापट मार्ग,
पुणे ४११००४.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ जून.
*दिनेश मोदी संस्थेचा एम. ए.
(नाणी व पदके यांचा अभ्यास व पुरातत्व)
विषय- नाणी व पदके यांचा अभ्यास, शीलालेखन शास्त्र (ब्रह्मी सारख्या प्राचीन आणि मध्यकालीन लिपी, खरोशती, ग्रीक, पíशयन / अरेबिक), पुरातत्व आणि नाणेशास्त्र, व्यापार आणि भारतीय अन्टीक्टीस कायदे, नाणेशास्त्र छायाचित्रण.
कालावधी : दोन वष्रे
पात्रता : कला आणि गर कला मध्ये पदवी (नॉन कला पदवीधरांना प्रवेशचाचणी द्यावी लागेल.)
प्रवेशाची अंतिम मुदत : १५ जून
पत्ता : सरोज सदन, मुलांच्या वसतिगृहासमोर, मुंबई विद्यापीठ,
विद्यानगरी, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०००९८
दूरध्वनी :०२२-२६५३०२७० / ९८२०४७७६३९
ईमेल : dineshmodyinstitute@gmail.com