रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया- मुंबई येथे संशोधन अधिकाऱ्यांच्या १७ जागा:
अर्जदारांनी अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पात्रता कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा संशोधनपर पीएच.डी. केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जून २०१३.
विविध विमा कंपन्यांमध्ये साहाय्यकांच्या २६०० जागा :
उमेदवार पदवीधर असावेत अथवा त्यांनी बारावीची परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. संबंधित प्रादेशित भाषेचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्शुरन्स कंपनीची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.nationalinsuranceindia.comया संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०१३.
भाभा अणु-संशोधन केंद्रात टेक्निकल ऑफिसर्सच्या १० जागा :
उमेदवारांनी केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअिरगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भाभा अणु-संशोधन केंद्राची जाहिरात पाहावी अथवा ‘बीएआरसी’च्या http://www.barcrecruit.gov.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०१३.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा