उत्तर-मध्य रेल्वेत खेळाडूंसाठी ४९ जागा
अर्जदारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी अॅथलेटिक, क्रिकेट, हॉकी, टेबलटेनिस, भारोत्तोलन, बॅडमिंटन, पोहणे यांसारख्या क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरच्या अंकात प्रकाशित झालेली उत्तर-मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा रेल्वेच्या http://www.ncr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज चेअरमन, रेल्वे रिक्रुटमेंट सेल, नॉर्थ सेंट्रल रेल्वे, नवाब युसुफ रोड, वाल्मीकी चौराहा, अलाहाबाद, उत्तर प्रदेश- २११००१ या पत्त्यावर २८ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेत स्काउट व गाइड्ससाठी ८ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत. त्यांनी स्काउट्स अथवा गाइड्स म्हणून राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा रेल्वेच्या http://www.secr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट पसरेनेल ऑफिसर (रिक्रुटमेंट), रेल्वे रिक्रुटमेंट सेल, आरटीएस कॉलनी, केंद्रीय विद्यालयाजवळ, एसईसी रेल्वे कॉलनी, बिलासपूर ४९५००४ या पत्त्यावर
२९ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
दमण व दीव प्रशासनात ऑडिटरच्या ३ जागा
उमेदवारांनी बी.ए. पदवी अर्थशास्त्रासह उत्तीर्ण केलेली असावी. सहकार विषयातील पदविका उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
४ ते १० ऑक्टोबर २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली दीव-दमण प्रशासनाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट रजिस्ट्रार, को-ऑपरेटिव्ह सोसायटीज, दीव-दमण प्रशासन, कलेक्टोरेट बिल्डिंग, धोलार, दमण ३९६२२० या पत्त्यावर ३ नोव्हेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
दि न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीमध्ये असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सच्या ५०९ जागा
उमेदवार इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांनी सीए, आयसीडब्लूए, एमबीए, कायदा यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रता प्राप्त केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
११ ते १७ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http:\\newindia.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३ नोव्हेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावा.
केंद्रीय कामगार मंत्रालयात साहाय्यक कामगार आयुक्तांच्या १४ जागा
अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी कार्मिक व्यवस्थापन, औद्योगिक संबंध, कामगार कायदे यांसारख्या विषयांतील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. कायदा विषयातील पदवीधरांना प्राधान्य. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http:\\www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३० ऑक्टोबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.