सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुडकी येथे सायंटिस्टच्या ३१ जागा
अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३२ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुडकी- २४७६६७ या पत्त्यावर २० ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबलच्या ८० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. याशिवाय ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी सीमा सुरक्षा दलाच्या http://www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टोरेट जनरल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, रिक्रुटमेंट सेक्शन, ब्लॉक नं. १०, आठवा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर
२१ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, त्रिवेंद्रम येथे टेक्निकल ऑपरेटर(ड्रिलिंग)च्या १४ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची मेकॅनिक वा वेल्डरची पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ ऑगस्ट २०१४ च्या अंकात सेंट्रल ग्राऊंड वॉटरची प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, केदारम्, केशवदशपुरम, त्रिवेंद्रम, केरळ- ६९५००४ या पत्त्यावर २२ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
मध्य रेल्वेत खेळाडूंसाठी ५२ जागा
अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी बॅडमिंटन, बुद्धिबळ, हॉकी, कबड्डी, अॅथलेटिक्स, क्रिकेट, फुम्टबॉल, टेनिस यांसारख्या क्रीडा प्रकारांत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (आर. टी.), जनरल मॅनेजर्स बिल्डिंग, पहिला मजला, छत्रपती शिवाजी टर्मिनस, बोरिबंदर, मुंबई- ४००००१ या पत्त्यावर २२ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
नौदलात अधिकारीपदावर संधी
अर्जदारांनी इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा एमएस्सी पदवी ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या http://www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २४ ऑक्टोबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.
इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन)च्या २२९ जागा
अर्जदारांनी बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय घेऊन कमीत कमी ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ ते ३ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-निबेटन सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील व संपूर्णपणे भरलेले अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल, हेडक्वार्टर्स, सेंट्रल फ्रंटियर, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स, प्लॉट नं. १६३-१६४, त्रिलोचननगर, शाहपुरा, भोपाळ (म.प्र.) ४६२०३९ या पत्त्यावर २४ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
डायरेक्टोरेट ऑफ लाइट हाऊसेस अॅण्ड लाइटशिपमध्ये लाइट हाऊस अटेंडंटच्या २६ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स वा रेडिओ मेकॅनिकची पात्रता प्राप्त असावी. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली डायरेक्टोरेट ऑफ लाइट हाऊसेस अॅण्ड लाइटशिपची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टोरेट ऑफ लाइट हाऊसेस अॅण्ड लाइटशिप, दीप भवन, ५/२०, जाफर सॅरंग स्ट्रीट, चेन्नई- ६००००१ या पत्त्यावर २५ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला येथे क्राफ्टस्मनच्या १० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी मॅसन, प्लंबर, सुतारकाम, रेफ्रिजरेशन यांसारख्या विषयांत उमेदवारी केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर वर्क्स, खडकवासला ही जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज चीफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला, पुणे- ४११०२४ या पत्त्यावर २५ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये चंद्रपूर येथे अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी)च्या २४ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा व मेकॅनिकल, मेटॅलर्जी, इलेक्ट्रिकल, केमिकल वा इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉटमेंट न्यूज’च्या २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अथॉरिटीची जाहिरात पाहावी अथवा ‘सेल’च्या http://www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २६ ऑक्टोबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.
सेंट्रल काऊन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसीन, नवी दिल्ली येथे रिसर्च ऑफिसर (पॅथॉलॉजी)च्या ७ जागा
अर्जदार एमबीबीएस पदवीधर असावेत. त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल काऊन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसीनची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले, आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सेंट्रल काऊन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसीन, ६१-६५, इन्स्टिटय़ूशनल एरिया, डी ब्लॉकसमोर, जनकपुरी, नवी दिल्ली ११००५८ या पत्त्यावर २६ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.