कर्मचारी निवड आयोगाची स्टेनोग्राफर निवड परीक्षा २०१३  
अर्जदार बारावी उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांना लघुलेखन आणि संगणकाचे ज्ञान असायला हवे.   वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या २८ सप्टेंबर-४ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी.
महाराष्ट्रातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रूटमेंट तिकिटांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक पश्चिम क्षेत्र, कर्मचारी निवड आयोग, प्रतिष्ठा भवन, १०१ महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०० ०२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०१३.
रेल्वेच्या वाराणसी येथील कारखान्यात खेळाडूंसाठी २५ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत, त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी व बास्केटबॉल, क्रिकेट, हॉकी, हँडबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, रस्सीखेच यांसारखा क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या २८ सप्टेंबर-४ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी सीपीओ एचक्यू, जीएम (पी) ऑफिस, डीएलडब्लू, वाराणसी २२१ ००४ (उ.प्र.) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०१३.
दक्षिण-पूर्व रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी ३१ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी बॅडमिंटन, हॉकी, कबड्डी, भारोत्रोलन, नेमबाजी, टेबल-टेनिस, व्हॉलीबॉल यांसारख्या विषयांत राज्य व राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले असावे.        वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या २८ सप्टेंबर-४ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा द. पू. रेल्वेच्या http://www.scz.indianrailways.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट), साऊथ ईस्टर्न रेल्वे, १५, गार्डन रिच रोड, कोलकाता ६०० ०४३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०१३.
सैन्यदलात इंजिनीअर होणाऱ्यांसाठी ६० जागा
अर्जदार विद्यार्थी सिव्हिल, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, प्रॉडक्शन ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, मेटॅलर्जिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स-कम्युनिकेशन, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या विषयांच्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २४ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ जुलै-२ ऑगस्ट २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज रिक्रूटिंग डायरेक्टोरेट, इंटीग्रेटेड एचक्यू ऑफ एमओडी (आर्मी), वेस्ट, ब्लॉक-३, आर.के. पूरम, नवी दिल्ली ११० ०६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०१३.
नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सव्‍‌र्हे, नागपूर येथे लिपिकांच्या ५ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांच्याजवळ इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रति मिनिट, तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रति मिनिट पात्रता असायला हवी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सव्‍‌र्हेची जाहिरात पाहावी अथवा ब्युरोच्या http://www.nbsslwp.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०१३.