‘सीएसआयआर’अंतर्गत अकादमी ऑफ सायंटिफिक रिसर्चमध्ये पदवीधर इंजिनीअर्ससाठी १९९ जागा : अर्जदारांनी अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी ‘गेट’ प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रिअल रिसर्चच्या http://acsir.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०१३.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डसमध्ये टेक्निकल असिस्टंटच्या ९७ जागा : उमेदवारांनी विज्ञान विषयांसह बीएस्सी अथवा केमिकल, मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ एप्रिल ते ३ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डची जाहिरात पाहावी अथवा स्टँडर्डच्या http://www.bis.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०१३.
डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेन्ट- ग्वाल्हेर येथे ७ फेलोशिप्स : अर्जदारांनी ऑर्गेनिक, फिजिकल वा अॅनलॅटिकल केमिस्ट्री अथवा बायो- इन्फरमॅटिक्समधील एमएस्सी पात्रता कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी सीएसआयआर, यूजीसी, एनईटी, ‘गेट’ यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ एप्रिल २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेन्टची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेन्ट, झांशी मार्ग, ग्वाल्हेर ४७४००२ (म. प्र.) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ मे २०१३.
‘एमएसटीसी’मध्ये ज्युनिअर मॅनेजर- सिस्टिम्सच्या ७ जागा : अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक / कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा एमसीए पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ एप्रिल ३ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘एमएसटीसी’ची जाहिरात पाहावी अथवा http://www.mstcindia.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि असिस्टंट जनरल मॅनेजर (पी अॅण्ड ए), एमएसटीसी लि., २२५- सी, एजेसी बोस रोड, कोलकाता- ७०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १८ मे २०१३.
वन- संशोधन संस्था, जोधपूर येथे टेक्निकल असिस्टंटच्या १२ जागा : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी लायब्ररी सायन्समधील पदव्युत्तर पात्रता घेतलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ एप्रिल २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली एरिड फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.afri.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र व डिमांडड्राफ्टसह असणारे अर्ज डायरेक्टर, एरिड फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, पोस्ट ऑफिस कृषी- मंडई, न्यू पाली रोड, जोधपूर- ३४२००५ (राजस्थान) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० मे २०१३.
संरक्षण उत्पादन विभाग- खडकी, पुणे येथे कुशल कामगारांच्या ६ जागा : अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची टूल अॅण्ड डायमेकर, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मिलर, वेल्डर, शीट मेटल वर्कर यांसारखी पात्रता पूर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण उत्पादन विभाग, खडकी- पुणेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सीनिअर क्वालिटी अॅशुरन्स एस्टॅब्लिशमेन्टस् (आर्मामेंटस), खडकी- पुणे- ४११००३
या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ मे २०१३.
शैक्षणिक संधी
1. संस्था व अभ्यासक्रम
* नॅशनल अॅग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट, मोहाली येथील संशोधनपर फेलोशिप
संदर्भ
http://acsir.res.in
दूरध्वनी ०९७२-४६०४८८८
संपर्क
नॅशनल अॅग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूट, सी-१२७, इंडस्ट्रियल एरिया, फेज-८, एसएएस नगर, मोहाली- पंजाब
शेवटची तारीख
१६ मे
2. संस्था व अभ्यासक्रम
* ‘सीएसआयआर’अंतर्गत असणाऱ्या अकादमी ऑफ सायंटिफिक अॅण्ड इनोव्हेटिव्ह रिसर्चमधील एकत्रित एमटेक-पीएचडी अभ्यासक्रम
संपर्क
http://acsir.res.in
शेवटची तारीख
१६ मे
3. संस्था व अभ्यासक्रम
* सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज नॉटिकल अॅण्ड इंजिनीअरिंग ट्रेनिंग, कोची येथील पदवी अभ्यासक्रम
संदर्भ
http://www.cifnet.gov.in
दूरध्वनी ०४८४-२३५१६१०
संपर्क
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज नॉटिकल अॅण्ड ट्रेनिंग, फाइन आर्टस एव्हेन्यू, कोची ६८२०१६
शेवटची तारीख
१७ मे
4. संस्था व अभ्यासक्रम
* सिंबॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथील बीए-एलएलबी व बीबीए- एलएलबी पदवी अभ्यासक्रम
संदर्भ
http://www.symlaw.ac.in
दूरध्वनी ०२०-२५६७१७११
संपर्क
सिंबॉयसिस लॉ स्कूल, सेनापती बापट मार्ग,
पुणे-४११००४
शेवटची तारीख
१७ मे
5. संस्था व अभ्यासक्रम
* दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचा एमटेक-पीएचडी अभ्यासक्रम.
संदर्भ
http://www.dtuadmissions.nic.in
संपर्क
जॉइंट रजिस्ट्रार (अॅडमिनिस्ट्रेशन), दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बवाना रोड, दिल्ली-११००४२
शेवटची तारीख
१८ मे
6. संस्था व अभ्यासक्रम
* बीएलडीई युनिव्हर्सिटी- विजापूर येथील एमबीबीएस
संदर्भ
http://www.bldeuniversity.org
दूरध्वनी ०८३५२-२६४०३०
संपर्क
रजिस्ट्रार, बीएलडीई युनिव्हर्सिटी, सोलापूर मार्ग, विजापूर- ५८६१०३ (कर्नाटक)
शेवटची तारीख
१८ मे
7. संस्था व अभ्यासक्रम
* जेएसएस युनिव्हर्सिटी- म्हैसूर येथील एमबीबीएस.
संदर्भ
http://www.jssuni.edu.in
संपर्क
रजिस्ट्रार, जेएसएस युनिव्हर्सिटी, श्री शिवतीर्थेश्वर नगर, म्हैसूर- ५७००१५ (कर्नाटक)
शेवटची तारीख
१८ मे
8. संस्था व अभ्यासक्रम
* नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद येथील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
संदर्भ
http://www.nalsarpro.org
दूरध्वनी ०४०-२३४९८४०४
संपर्क
दि को-ऑर्डिनेटर, नालसार प्रॉक्झिमेट एज्युकेशन, जस्टीस सिटी, समीर पेठ, हैदराबाद- ५०००७८
शेवटची तारीख
२० मे
9. संस्था व अभ्यासक्रम
* ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अॅण्ड हिअरिंग, म्हैसूर येथील संशोधनपर पीएचडी.
संदर्भ
http://www.aiishmysore.in
दूरध्वनी ०८२१-२५१४४४९
संपर्क
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अॅण्ड हिअरिंग, नैमिशम कॉम्प्लेक्स, मानसगंगोत्री, म्हैसूर- ५७०००६ (कर्नाटक)
शेवटची तारीख
२० मे
10. संस्था व अभ्यासक्रम
* आयआयएम- इंदोर येथे व्यवस्थापकांसाठी विशेष अभ्यासक्रम
संदर्भ
http://www.iimidr.ac.in / iimi/pages/programmes-main
संपर्क
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, प्रबंध शिखर, राऊ-पियमपूर मार्ग, इंदोर- ४५३५५६. (म.प्र.)
शेवटची तारीख
२२ मे