सर्व नेते, विक्रेते व व्यवस्थापक यांच्यामध्ये एक समान गुण असतो – दोन कान, एक जीभ! याचा अर्थ ते जितकं बोलतात, त्याच्या दुप्पट ऐकतात. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहे ते तुम्हाला आधीच समजते. जर समोरच्याला प्रभावित करण्यासाठी तुम्ही जास्त बोलत असाल, ओरडून सांगत असाल तर तुमचा हेतू साध्य होत नाही. उलट त्याचा विपरीत परिणाम होतो. महत्त्वाच्या गोष्टी कानगोष्टींतूनच कळतात. ऐकणारा माणूस कसे ऐकतो, त्याचेही निरीक्षण करा. ऐकावे कसे?
ऐकण्यात रस दाखवा – सांगणाऱ्याच्या डोळ्यात पाहत पुढे झुकून ऐका. बोलणाऱ्याच्या देहबोलीचा अभ्यास करा आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद द्या. त्यांच्या बोलण्याचा सारांश लक्षात घ्या.  ऐकून घेतल्यानंतर विचार करता येतो. समोरच्याचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सारांश काढल्याने गैरसमज निर्माण होत नाहीत. ऐकणे याचा अर्थ जे ऐकता, त्याला संमती देणे असा नाही. त्यातून तुम्हाला उपयुक्त अशी माहिती मिळते व तुम्हाला जेव्हा बोलायची संधी मिळते, त्यावेळी तुम्ही अज्ञानात, अंधारात चाचपडत बोलत नाही. ऐकल्यानंतर तुम्ही जेव्हा बोलता, त्यावेळी तुमचे बोलणे अधिक परिणामकारक होते.  मोबाइल एमबीए – जो ओवेने, पिअर्सन, मराठी भाषांतर – डायमंड पब्लिकेशन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा