वित्तीय क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ म्हणजेच बीएसई इन्स्टिटय़ूट, मुंबई येथे उपलब्ध असणाऱ्या वित्तीय सेवा व गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील खाली नमूद केल्याप्रमाणे असणाऱ्या विशेष अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध आहेत –
ग्लोबल फायनान्शियल मार्केटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम : दोन वर्षे कालावधीच्या व मुंबई, दिल्ली व अहमदाबाद येथे उपलब्ध असणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये वित्तीय क्षेत्रातील प्रशिक्षित व अनुभवींना वित्तीय व्यवहार व जागतिक आर्थिक व्यवहार इ.चा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
बँकिंग व फायनान्स विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम : एक वर्ष कालावधीच्या आणि मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता व चेन्नई येथे उपलब्ध असणाऱ्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमात वेगाने विकसित होण्याचा बँकिंग व वित्तीय सेवा आर्थिक क्षेत्राचा विस्तारासह परिचय करून देण्यात येणार आहे.
गुंतवणूक व्यवस्थापनविषयक विशेष अभ्यासक्रम : एक वर्ष कालावधीच्या व दूरस्थ शिक्षण पद्धतीअंतर्गत टपालाद्वारा उपलब्ध असणाऱ्या या विशेष अभ्यासक्रमात गुंतवणूक व्यवस्थापन व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यास व कौशल्याचा समावेश करण्यात येणार आहे.
अधिक माहिती व तपशील : वरील अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती
व तपशिलासाठी बीएससी इन्स्टिटय़ूट लिमिटेडच्या नि:शुल्क दूरध्वनी
क्र. १८००२२९०३० वर अथवा इन्स्टिटय़ूटच्या admission@bseindia.com   ई-मेलवर संपर्क साधावा अथवा http://www.bsebti.comया संकेतस्थळाला भेट द्यावी.
० अर्ज पाठविण्याचा पत्ता : संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज बीएसई इन्स्टिटय़ूट लिमिटेड, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लि., १८ वा व १९ वा मजला, पी. जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई-४००००१ या पत्त्यावर पाठवावेत.
बँकिंग, वित्तीय सेवा व गुंतवणूक व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण-अभ्यासक्रमासह करिअर करण्यासाठी या अभ्यासक्रमांचा विचार करता येईल.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा