कलात्मकता आणि उत्तम अर्थार्जनाचा मिलाफ असलेल्या फ्लोरल डिझायनिंग
या क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि व्यवसाय संधींची सविस्तर माहिती-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फ्लोरल डिझाइन म्हणजे पानाफुलांचे उत्तमरीत्या केलेले सादरीकरण. म्हटली तर ही कलाही आहे आणि विज्ञानही. बदलती जीवनशैली आणि वाढते दरडोई उत्पन्न यामुळे देशातील फ्लोरल डिझायिनग बाजारपेठेत मोठी वाढ झाली आहे. यामुळे साहजिकच प्रशिक्षित फ्लोरल व्यावसायिकांची मोठी निकड निर्माण झाली आहे.
फ्लोरल डिझायनर क्षेत्रात काम करणाऱ्यांना सर्जनशील आव्हानांचे आणि कलात्मक संधीचे विश्व खुले आहे.
फ्लोरल डिझायनिंग हा अनोखा आणि उत्तम अर्थार्जनाची क्षमता असलेला व्यवसाय असून यामध्ये वैविध्यपूर्ण कौशल्य आणि क्षमतांचा मेळ साधला जातो. हा व्यवसाय आपली नोकरी तसेच स्वत:चा व्यवसाय सांभाळूनही करता येतो.
प्रशिक्षित फ्लोरल डिझायनरसाठी आखण्यात आलेल्या अभ्यासक्रमात सैद्धांतिक माहिती आणि प्रात्यक्षिके यांचा समावेश असतो. फ्लोरल डिझायनिंगचा इतिहास, विविध प्रकारची फुले ओळखणे, स्थानिक तसेच आयात केली जाणारी फुले यांचा परिचय करून, पानांचे बोटॅनिकल नाव आणि ती किती दिवस टिकतात, याबाबत माहिती दिली जाते. फुलांचे उपयोग आणि वैशिष्टय़ेही सांगितली जातात. फुले अधिक टिकावीत यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते, त्याची पद्धत शिकवली जाते. त्याकरता उपयोगात आणल्या जाणाऱ्या उत्पादनांची माहिती दिली जाते. विविध प्रकारची फ्लोरल फोम उत्पादने आणि अॅक्सेसरीज यांची माहितीही अशा प्रकारच्या अभ्यासक्रमादरम्यान दिली जाते. विविध कार्यक्रम, समारंभ याकरता केल्या जाणाऱ्या फ्लोरल अरेंजमेन्टचा बेस असलेल्या रंगाची थिअरी या वर्गात स्पष्ट केली जाते. तसेच डिझाइनची मूळ तत्त्वे आणि घटक शिकवले जातात.
फ्लोरल डिझायनिंग कलेत उपयोगात आणली जाणारी विविध फ्लोरल तंत्रे, आकार आणि स्टाइल्स शिकवल्या जातात. प्रात्यक्षिकांवर आधारित विविध संकल्पनांवर विद्यार्थ्यांना काम करावे लागते. या संदर्भातील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना स्थानिक फुले वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
जर फुले सहज उपलब्ध होणारी असली तर संपूर्ण अरेंजमेंट सवलतीच्या दरात होऊ शकते. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन आणि पर्यायाने फ्लोरिकल्चर उद्योगाला चालना मिळते.
फ्लोरल डिझायनिंगच्या अभ्यासक्रमांमध्ये शेतकरी तसेच नर्सरीत फील्ड ट्रीप करण्यावर भर देण्यात येतो. अनेक अभ्यासक्रमांच्या अंती फ्लोरल डिझायनर्सकडे इंटर्नशिप करण्याची संधी मिळू शकते.
फुलांची आवड आणि स्वतंत्र उद्योजक बनण्याची इच्छा असलेल्यांना हा करिअरचा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
विविध प्रकारची फुले आणि पाने यांची सजावट योग्य पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण तर संबंधित अभ्यासक्रमात मिळतेच, त्याबरोबरच रंगसंगतीचे सिद्धान्त, डिझाइन तंत्र विद्यार्थ्यांना शिकता येते.