देशाच्या हवाई दलातील वैमानिक होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या किंवा भारतीय नौदल वा भूदलात अधिकारी होण्याची जिगर असलेल्या तरुणांसाठी उत्तम पर्याय म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवणे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या जानेवारी २०१४ पासून सुरू होणाऱ्या १३१ व्या तुकडीच्या प्रवेशाकरिता बारावीत शिकत असलेले अथवा बारावी उत्तीर्ण तरुण अर्ज करण्यास पात्र ठरतात. या परीक्षेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे.
प्रवेश पात्रता :
कला, वाणिज्य तसेच शास्त्र शाखेत बारावीत शिकणारे वा बारावी उत्तीर्ण मुलगे अर्ज करण्यास पात्र आहेत. या परीक्षेला मुलींना अर्ज करता येणार नाही. अर्ज करताना मुलाचे वय साडेपंधरा ते १८ वर्षे वयोगटात असणे आवश्यक आहे. कारण प्रबोधिनीत प्रवेशाच्या वेळी त्याचे वय साडेसोळा ते १९ वर्षे असायला हवे. अर्ज करणाऱ्या तरुणांची जन्मतारीख २ जानेवारी १९९५ आणि १ जुलै १९९७ यामधील असणे आवश्यक आहे.
रिक्त जागा –
एकूण ३५५ प्रवेशजागा आहेत, ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
ा एन. डी. ए. : ३००
(आर्मी विंग : १९५, नेव्हल विंग : ३९,
एअर फोर्स विंग : ६६)
ा इंडियन नेव्हल अॅकॅडमी : ५५
(१०+२ कॅडेट एन्ट्री स्कीम)
अर्ज भरण्याची प्रक्रिया –
शनिवार, २२ डिसेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मधील जाहीर निवेदन वाचावे. आपल्याला हे निवेदन ६६६.ीेस्र्’८ेील्ल३ल्ली६२.ॠ५.्रल्ल तसेच ६६६.४स्र्२ू.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावरही पाहता येईल. या निवेदनात अर्ज भरण्याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
उमेदवारांना (एस. सी./ एस. टी. उमेदवार सोडून) रु. १००/- (रुपये शंभर) परीक्षा शुल्क भरायचे आहे. हे परीक्षा शुल्क ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या कोणत्याही शाखेत भरता येते किंवा ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून भरता येऊ शकतो. एस. सी./ एस. टी. उमेदवारांना फी माफ असल्याने त्यांनी परीक्षा शुल्क भरायची गरज नाही.
अर्ज ऑनलाइन भरावयाचा असून ६६६.४स्र्२ूल्ल’्रल्ली.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळाचा वापर करावयाचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०१३ आहे.
लेखी परीक्षा –
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अॅण्ड नेव्हल अॅकॅडमी- २०१३ ची लेखी परीक्षा रविवार, १४ एप्रिल २०१३ रोजी होईल. यू.पी.एस.सी.तर्फे घेतली जाणारी ही परीक्षा महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर या दोन शहरांत घेतली जाते. या परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात- ३०० गुणांची गणिताची प्रश्नपत्रिका आणि जनरल अॅबिलिटी टेस्ट ही ६०० गुणांची प्रश्नपत्रिका. ज्यामध्ये इंग्रजी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सामान्य विज्ञान तसेच सामान्य ज्ञानाचा समावेश असतो. प्रश्नपत्रिका इंग्रजी तसेच हिंदी भाषांमध्ये असते. (फक्त इंग्रजी विषयाचे प्रश्न सोडून) ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपाची (टउद) असते. चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह गुण असतात. उत्तरपत्रिकेत फक्त काळ्या रंगाच्या बॉलपेनचा वापर करावा. लेखी परीक्षेचा निकाल जुलै/ऑगस्ट २०१३ च्या सुमारास लागतो आणि हा निकाल ६६६.४स्र्२ू.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावर पाहायला मिळतो.
एस. एस. बी. मुलाखत –
लेखी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या युवकांना ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यांत एस. एस. बी. मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. मुलाखतीच्या तारखा तसेच केंद्राविषयीची माहिती भूदल/नौदल/ हवाई दलाच्या संकेतस्थळावर पाहावयास मिळू शकते तसेच याविषयीचे लेखी पत्रदेखील उमेदवारांना टपालाद्वारे मिळते. ही मुलाखत दोन टप्प्यांत घेतली जाते. पहिल्या टप्प्यात इंटेलिजन्स टेस्ट, पिक्चर परसेप्शन अॅण्ड डिस्कशन टेस्ट घेण्यात येते. या टप्प्यात पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यांत मानसिक चाचणी, समूह चर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीला सामोरे जावे लागते. सर्व परीक्षण संपल्यावर तिथेच सर्व उमेदवारांसमोर निकाल जाहीर करण्यात येतो. ही मुलाखतीची प्रक्रिया पाच दिवस चालते.
गुणवत्ता यादी –
मुलाखतीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. ही तपासणी सैनिकी रुग्णालयात
करण्यात येते. ही प्रक्रियादेखील चार-पाच दिवस सुरू राहते.
लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या एकत्र गुणांच्या आधारावर राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. ही यादी साधारणपणे येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस अथवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात येतो.
वैद्यकीय चाचणीत पात्र ठरलेल्या, बारावी उत्तीर्ण तरुणांना गुणवत्ता यादीतील स्थानाप्रमाणे आणि असलेल्या जागांच्या आधारे रुजू होण्याविषयी सूचना देण्यात येतात. साधारणपणे डिसेंबर २०१३ अखेरीस हे तरुण एन.डी.ए.मध्ये रुजू होतात.
अधिकाऱ्याचे पगार व भत्ते –
एन.डी.ए.चे तीन वर्षे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर
हे उमेदवार इंडियन मिलिटरी अॅकॅडमी-देहरादून
किंवा एअरफोर्स अॅकॅडमी-डुंडीगल किंवा नेव्हल अॅकॅडमी एझीमाला (केरळ) येथे वर्षभर अथवा
त्या सेवेमधील प्रशिक्षणाच्या वेळी उमेदवारांना २१ हजार रु. प्रशिक्षण भत्ता मिळतो. हे प्रशिक्षण यशस्वीपणे
पूर्ण झाल्यानंतर त्यांना आर्मीमध्ये ‘लेफ्टनंट’,
नेव्हीमध्ये ‘सबलेफ्टनंट’, तसेच एअरफोर्समध्ये ‘फ्लाइंग ऑफिसर’ रँकमध्ये कमिशन मिळते. या रँकचे
बेसिक वेतन १५,६००-३९,१०० असे आहे. कमिशन झालेल्या अधिकाऱ्यास आजच्या वेतनश्रेणीप्रमाणे रु. ६६,५००/- ते रु. ८३,५००/- इतके वेतन व भत्ते मिळून पगार असतो. या व्यतिरिक्त अनेक सवलती उपलब्ध असतात.
ज्या युवकांना साहसी जीवनाची आवड आहे, ज्या तरुणांना चाकोरीबाहेरचे जीवन जगायला आवडते, काहीतरी वेगळे करावेसे वाटते, आव्हाने स्वीकारावयास आवडतात, देशातील विविध भागांत राहण्याचा
आनंद घ्यावासा वाटतो, अशा युवकांना भारतीय सशस्त्र दलांतील करिअर निश्चितच भुरळ घालेल आहे. करिअरची ही दिशा म्हणजे देशसेवा करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.
– लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर