सर्वात आधी नैतिक मुद्दा काय आहे हे ओळखा, म्हणजेच समोर असणारी परिस्थिती किंवा घेतला जाणारा निर्णय हा कोणत्या गटांवर, त्या गटाच्या हितसंबंधांवर परिणाम करतो, याची माहिती घ्या. मला घ्यायचा असणारा निर्णय हा दोन चांगल्या पर्यायापकी एक आहे की दोन वाईट पर्यायांपकी आहे, याची पडताळणी करा.
मला घ्यावयाचा निर्णय हा केवळ कायदेशीर मुद्दय़ांशी निगडित आहे की कायदेशीर मुद्दय़ांच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करावा लागणार आहे? तसे असल्यास का व कसा?
०    वस्तुस्थिती (तथ्य) अभ्यासा – समोर असणाऱ्या प्रसंगातील किंवा घ्यावयाच्या निर्णयातील सर्व निगडित तथ्यांचा विचार करा. कोणती तथ्ये आहेत, त्यांचा अधिक अभ्यास कसा करता येईल, मला या प्रसंगाशी निगडित असणाऱ्या तथ्यांचा पूर्ण अभ्यास झाला आहे काय, की जेणेकरून मला निर्णय घेता येईल?
माझ्या निर्णयामुळे कोणते समूह, व्यक्ती प्रभावित होणार आहेत. त्या किती प्रमाणात प्रभावित होणार आहेत, त्यांच्याकडून होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियेची मला कल्पना आहे काय? नकारात्मक प्रतिक्रियेवर माझी भूमिका काय असेल याचा मी विचार केलेला आहे का?
 मी घेत असणाऱ्या निर्णयाला इतर पर्याय मी तयार ठेवले आहेत का? प्रभावित होणाऱ्या घटकांना मी विश्वासात घेण्याची गरज आहे काय? याचा विचार
निर्णय घेताना करावा लागणार आहे. उपलब्ध पर्यायांचे मूल्यांकन करताना आणखी काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.
०    कोणत्या पर्यायाने जास्तीतजास्त फायदा व कमीतकमी नुकसान होणार आहे?(उपयुक्ततावादी विचार)
०    कोणत्या पर्यायामुळे प्रभावित होणाऱ्या सर्व लोकांच्या अधिकारांचे संरक्षण होणार आहे? (अधिकारवादी विचार)
०    कोणत्या पर्यायामुळे सर्व लोकांना समानतेची वागणूक मिळणार आहे?
०    कोणता पर्याय हा फक्त एका गटाचे हित साध्य न करता संपूर्ण समाजाचे हित साध्य करणार आहे? उपलब्ध पर्यायांपकी कोणता पर्याय मला हवी तशी इमेज बनविण्यासाठी उपयोगी आहे?
०    निर्णय निश्चित करा आणि त्याची छोटी चाचणी घ्या – उपलब्ध पर्यायांचा आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून सर्वात चांगला पर्याय निवडावा लागेल. हा निर्णय मी माझ्या जवळच्या लोकांना किंवा प्रसारमाध्यमांमध्ये सांगितला तर त्यांची काय प्रतिक्रिया असेल, याचा विचार करावा. घेतलेल्या निर्णयावर कार्यवाही करत असताना या निर्णयाशी निगडित सर्व लोकांची काळजी करून तो निर्णय अधिक चांगल्या पद्धतीने कसा राबवला जाऊ शकतो, या सर्व बाबींचा समावेश Ethical Decision Making  मध्ये करता येऊ शकतो.
या विषयाचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या संज्ञांचा शासकीय/ कौटुंबिक निर्णय प्रक्रियेमध्ये कसा वापर केला जाऊ शकतो, यावर विचार करणे फायद्याचे ठरेल.
उदा. Objectivity, impartiality, dignity of Labour, Punctuality, regularity, Courtesy, Politeness, respect, truth, Honesty, Care, dedication, Non Violence, Compassion, Courage, Self-decipline, loyalty, faith, Secularism, Scienticism, Rationality, Constitutionalism, Ethics of Justice, Ethics of care etc.
तसेच दैनंदिन घडामोडींमध्ये येणाऱ्या नतिक मुद्दय़ांचा विचार करावा उदा. Surrogacy Motherhood  मध्ये येणाऱ्या नैतिकतेच्या समस्या, क्लोिनग किंवा Organ transplant  मध्ये येणारे नतिकतेचे प्रश्न (नुकताच Ship of Theseusनावाचा एक सिनेमा याच मुद्दय़ांशी निगडित होता.) इत्यादी.                                                       
admin@theuniqueacademy@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा