फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे येथे उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांमध्ये खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत:
* दिग्दर्शनामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
* सिनेमॅटोग्राफीमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
* साऊंड रेकॉर्डिग आणि साऊंड डिझायनिंगमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
* संपादनामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
* अभिनयामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
* आर्ट डायरेक्शन व प्रॉडक्शन डिझाइनमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
* फीचर स्क्रीन-प्ले रायटिंगमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम.
* दिग्दर्शनामधील एक वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफीमधील एक वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* व्हिडीओ एडिटिंगमधील एक वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम.
* साऊंड रेकॉर्डिग अँड टीव्ही इंजिनीयरिंगमधील एक वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
अर्जदार पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत पुणे व मुंबई या परीक्षा केंद्रांवर १९ मे २०१३ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांची पात्रता व निवड परीक्षेतील गुणांकांच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक
अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास २,१५० रु.चा अकाऊंट्स ऑफिसर, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया यांच्या नावे असणारा व पुणे येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात २२ फेब्रुवारी २०१३ पर्यंत पाठवावा.
अधिक माहिती व तपशील
अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणेच्या दूरध्वनी क्र. ०२०-२५४३१८१७ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ftindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज परीक्षा नियंत्रक, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रस्ता, पुणे – ४११००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१३.
ज्या उमेदवारांना अभिनय, दिग्दर्शन, संपादन अशा कलात्मक व कलापूर्ण क्षेत्रात विशेष अभ्यासक्रमांसह आपले करिअर करायचे असेल अशांनी या संधीचा लाभ घ्यावा.
एफटीआयआय : प्रवेश पात्रता परीक्षा
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया, पुणे येथे उपलब्ध असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांमध्ये खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत: * दिग्दर्शनामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम. * सिनेमॅटोग्राफीमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम.
First published on: 25-02-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ftii entrance qualification test