० विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा – ५ अंश उत्तर आणि ५ अंश दक्षिण यादरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. या पट्टय़ाला विषुववृत्तीय शांत पट्टा असेदेखील म्हणतात. (Doldrums)
– विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. हे वारे विषुववृत्तीय पट्टय़ात एकत्र येत असल्याने त्यांना आंतर-उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा ((ITCI) असे म्हणतात. विषुववृत्तीय कमी दाबाच्या या पट्टय़ात घनदाट जंगले आढळतात. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात विषुववृत्तीय पट्टय़ात जे जंगल आढळते, त्याला सेल्वास (Selvas) असे म्हणतात.
० कर्कवृत्तीय व मकरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे – २५ अंश ते ३५ अंश उत्तर ते दक्षिण विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ातून ऊध्र्वगामी बनलेली हवा वर जाते. थंड होऊन ती कर्कवृत्त व मकरवृत्तावर अधोगामी दिशेने येते. त्यामुळे २५ अंश ते ३५ अंश उत्तर व दक्षिण पट्टय़ात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. या पट्टय़ाला उपउष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा (Sub Tropical High Pressure Belts) असेदेखील म्हणतात. या पट्टय़ाला अश्वअक्षांश (Horse latitudes) असेदेखील म्हणतात.
० उपध्रुवीय/ समशीतोष्ण कमी दाबाचा पट्टा – दोन्ही गोलार्धात ६० ते ७० अक्षवृत्ताचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून या प्रदेशांत हवेचा दाब कमी असतो. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे या पट्टय़ातील हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे हवा विरळ होऊन येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
० ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा – ध्रुवावर तापमान कमी असते व त्यामुळे तिथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
० कोरिऑलिस फोर्स – पृथ्वी फिरताना तिच्याभोवती वातावरणदेखील फिरत असते, पृथ्वीच्या या गतीमुळे निर्माण होणाऱ्या या शक्तीला कोरिऑलिस फोर्स असे म्हणतात. यांमुळे वाऱ्याच्या मूळ दिशेवर परिणाम होतो. यासंबंधी महत्त्वाच्या संशोधन फेरल या शात्रज्ञाने केले. त्यानुसार कोरिऑलिस फोर्समुळे वारे हे उत्तर गोलार्धात वाहताना आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने वाहतात. म्हणजेच आपल्या मूळ दिशेकडून डावीकडे वाहतात.
० वायुभार उतार (Pressure Gradient) – ज्या ठिकाणी समभार रेषा जेव्हा दूर अंतरावर असतात, त्या ठिकाणी वायुभार हा मंद असतो व वारे हे मंद गतीने वाहतात. ज्या ठिकाणी समभार रेषा जवळ असतात, त्या ठिकाणी वायुभार उतार हा तीव्र असतो व वारे अति वेगाने वाहतात.
० आवर्त (Cyclones) – ज्या वेळी काही स्थानिक कारणांमुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी कमी दाबाचे केंद्र निर्माण होते व त्यासभोवताली जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. तेव्हा वारे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे आकर्षलेि जातात व चक्राकार गतीने फिरू लागतात. त्यांना ‘आवर्त’ असे म्हणतात. आवर्त ज्या ठिकाणी निर्माण होतात, त्यावरून त्यांचे दोन प्रकार पाडण्यात येतात – उष्ण कटिबंधीय आवत्रे, समशीतोष्ण कटिबंधीय आवत्रे
१) उष्ण कटिबंधीय आवत्रे – हे आवर्त उष्ण कटिबंधात निर्माण होतात या आवर्ताचा वेग जास्त असतो. यामुळे होणारी वित्तहानी आणि जीवितहानी हीदेखील मोठय़ा प्रमाणात होते. या उष्ण कटिबंधीय आवर्ताना भारतीय चक्रीवादळ असे संबोधले जाते.
विभिन्न प्रदेशांत या आवर्ताना विभिन्न नावांनी ओळखले जाते. उदा. ऑस्ट्रेलियात विलिविली, पश्चिम पॅसिफिकमध्ये टायफून, अटलांटिकमध्ये हरिकेन, पूर्व पॅसिफिकमध्ये बिग विन्ड आणि फिलीपाईन्समध्ये बागुइओ या नावाने ओळखतात.
२) उष्ण कटिबंधीय आवर्ताचे प्रदेश – उत्तर अटलांटिक महासागरात ३० अंश उत्तर अक्षापर्यंत ही आवर्ते आढळतात. चीनच्या समुद्रात फिलिपाईन्स, व्हिएतनाम, दक्षिण चीन, दक्षिण जपान यांच्या आसपासच्या सागरी प्रदेशात ही आवर्ते आढळतात यांना टायफून असे म्हणतात. जून ते नोव्हेंबरच्या दरम्यान उत्तर पॅसिफिक महासागरात तसेच मेक्सिको व मध्य अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर ही वादळे येतात त्यांना हरिकेन असे म्हणतात. ऑस्ट्रेलियाच्या इशान्य व वायव्य महासागरीय प्रदेशात म्हणजे दक्षिण पॅसिफिक महासागरात ही आवत्रे आढळून येतात. बंगालच्या उपसागरात जुल-ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती होते. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी वादळे ही अरबी समुद्रापेक्षा जास्त असतात. अरबी समुद्रात या वादळाची निर्मिती होते. मात्र यांची संख्या कमी व मर्यादित असते.
० उष्ण कटिबंधीय आवर्ताची वैशिष्टय़े – आवर्ताच्या केंद्रभागी जो कमी दाबाचा पट्टा असतो त्याला आवर्ताचा डोळा (चक्षू) असे म्हणतात. हा आवर्तचा गाभा असून या भागात हवा अत्यंत शांत असते. तापमान हे जास्त असते व प्रदेश निरभ्र आकाश असते. या ठिकाणी पर्जन्य अजिबात असत नाहीत.
० उष्ण कटिबंधीय आवर्ताचे आकार – ज्या ठिकाणी उष्ण कटिबंधीय आवर्ताची निर्मिती होते, तिथे साधारणत: व्यास ८० किमी असतो. पुढे हा व्यास अधिकाधिक प्रमाणात विकसित होत जातो व त्याचा आकार ४०० ते १५०० किमीपर्यंत असू शकतो.
० हवेचा दाब – वायुभाराचा उतार हा तीव्र स्वरूपाचा असतो. आवर्ताचा चक्षू व अगदी कडेच्या भागाचा हवेतील भाग यांमधील फरक ५० ते ५५ मिमीपर्यंत आढळून येतो. समभार रेषांचा आकार साधारणत: लंबवर्तुळाकृती असतो. सागरी प्रदेशात आवर्ताचा वेग हा जास्त असतो. त्या तुलनेत भूभागावर असणाऱ्या आवर्ताचा वेग कमी असतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर येणारी आवर्ते ही जास्त विनाशकारी असतात.
० दिशा – उत्तर गोलार्धात आवर्ताची दिशा घडय़ाळाच्या काटय़ांच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धात आवर्ताची दिशा ही घडय़ाळाच्या दिशेने असते. उष्ण कटिबंधीय आवर्त हे प्रामुख्याने व्यापारी वाऱ्यांच्या क्षेत्रात आढळून येतात. त्यांची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे असते.
grpatil2020@gmail.com
जागतिक हवामानशास्त्र
विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा - ५ अंश उत्तर आणि ५ अंश दक्षिण यादरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. या पट्टय़ाला विषुववृत्तीय शांत पट्टा असेदेखील म्हणतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-05-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global climate science