कृषीविषयक विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा
भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे कृषी आणि कृषी-विज्ञान विषयांतर्गत पदवी, पदव्युत्तर व संशोधनपर पात्रता अभ्यासक्रमांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश पात्रता परीक्षा-२०१३ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत-
शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांजवळ खालीलप्रमाणे पात्रता असायला हवी-
पदवी अभ्यासक्रम : अर्जदाराने १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कृषी, जीवशास्त्र यासारख्या विषयांसह व कमीत कमी ५०% गुण घेऊन उत्तीर्ण केलेली असावी.
पदव्युत्तर अभ्यासक्रम : अर्जदारांनी कृषी, कृषी-विज्ञान, कृषी-अभियांत्रिकी, दुग्धोत्पादन, मत्स्यविज्ञान, फलोत्पादन, वन-विकास, अन्न प्रक्रिया, सहकार, कृषी विपणन, ग्रामीण वित्त यासारख्या विषयांसह पदवी उत्तीर्ण केलेली असायला हवी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
संशोधनपर पात्रता परीक्षा : अर्जदार विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विषयासह पदव्युत्तर परीक्षा कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
संबंधित अभ्यासक्रमातील गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी पाच टक्क्य़ांनी शिथिलक्षम आहे.
वयोमर्यादा : अर्जदार खालील वयोगटातील असावेत-
* पदवी अभ्यासक्रम : १७ ते २३ वर्षे.
* पदव्युत्तर अभ्यासक्रम : १९ वर्षांपेक्षा अधिक.
* संशोधनपर पात्रता परीक्षा : २१ ते ३० वर्षे.
निवड पद्धती : अर्जदार विद्यार्थ्यांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावले जाईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. निवड परीक्षा खालील तपशिलानुसार घेण्यात येईल –
* पदवी परीक्षा : २० एप्रिल २०१३.
* पदव्युत्तर परीक्षा : २१ एप्रिल २०१३.
* संशोधनपर पात्रता परीक्षा : २१ एप्रिल २०१३.
अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे विविध कृषी विद्यापीठ वा कृषी महाविद्यालयात संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास पदवी अभ्यासक्रमासाठी ५०० रु.चा तर पदव्युत्तर अभ्यासक्रम व संशोधनपर पात्रता परीक्षेसाठी ६०० रु. चा
डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह पाठवावेत.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ डिसेंबर २०१२ ते ४ जानेवारी २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय
कृषी संशोधन संस्थेची जाहिरात
पाहावी अथवा संस्थेचा ६६६.्रूं१.१ॠ.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन्स (एज्युकेशन), रूम नं. २१६, इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च, कृषी अनुसंधान भवन-२, पूसा, नवी दिल्ली ११००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१३.
ज्या विद्यार्थ्यांना कृषी, कृषी विज्ञान वा संबंधित क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर वा संशोधनपर क्षेत्रात आपले भविष्य घडवायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा जरूर विचार करावा.
ग्रीन करिअर्स
कृषीविषयक विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे कृषी आणि कृषी-विज्ञान विषयांतर्गत पदवी, पदव्युत्तर व संशोधनपर पात्रता अभ्यासक्रमांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश पात्रता परीक्षा-२०१३ साठी अर्ज मागविण्यात येत आहेत-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-01-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green careers