ग्रीसच्या दूतावासाकडून विदेशी नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या शासकीय शिष्यवृत्ती कार्यक्रमाची सविस्तर माहिती..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्री सच्या दूतावासाकडून विदेशी नागरिकांसाठी हेलेनिक (ग्रीक) शासकीय शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. हा शिष्यवृत्ती कार्यक्रम सर्व विद्याशाखांसाठी पदव्युत्तर व पीएच.डी.च्या अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असून या वर्षीच्या म्हणजे २०१३-१४ च्या शैक्षणिक प्रवेशासहित दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी विदेशी नागरिकांकडून दूतावासाने २६ जुल २०१३ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल..
ग्रीस शासनाच्या शैक्षणिक मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली ‘स्टेट स्कॉलरशिप फाऊंडेशन’ ही एक संस्था आहे. ज्याला ग्रीक भाषेत कङ असं म्हटलं जातं. कङ ची संबंधित शिष्यवृत्ती जरी सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली असली तरी संस्थेने त्यासाठी अर्जदारांना दोन गटांमध्ये विभागले आहे. या गटांना संस्थेने टाग्रेट १ व टाग्रेट २ अशी नावे दिलेली आहेत. शिष्यवृत्तींची एकूण संख्या ३० असून त्यातील १५ शिष्यवृत्त्या टाग्रेट १ गटाला म्हणजेच बाल्कन देश, पूर्वेकडील युरोपीयन राष्ट्रे, आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका या खंडांमधील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत तर उर्वरित १५ शिष्यवृत्त्या युरोपियन युनियनची सदस्य राष्ट्रे, नॉर्वे, स्वित्र्झलड, यूएसए, कॅनडा, जपान या टाग्रेट २ गटामधील राष्ट्रांच्या अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. ही शिष्यवृत्ती कोणत्याही शाखेतील अर्जदाराला त्याच्या पुढील उच्च शिक्षणासाठी (पदव्युत्तर, पीएच.डी.च्या आणि पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी) लागू आहे.
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदारांना ग्रीसमधील कोणत्याही विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल. या शिष्यवृत्तीचा कालावधी एक वर्षांचा आहे.
 शिष्यवृत्तीप्राप्त उमेदवाराला सुरुवातीला निवासासाहित इतर खर्चासाठी ६० हजार युरो एवढी रक्कम दिली जाते. यामध्ये त्याच्या टय़ुशन फीचा समावेश आहे. संस्थेकडून उमेदवारास मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शिष्यवृत्तीचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्षांच्या निकालावर अवलंबून असेल.
आवश्यक अर्हता
संस्थेच्या या शिष्यवृत्तीसाठी अर्जदार परदेशी नागरिक असावा. महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे फक्त एकाच देशाचं नागरिकत्व असावं (म्हणजे ग्रीस व त्याचा देश अशा दोन देशांचं दुहेरी नागरिकत्व त्याच्याकडे नसावं). या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराकडे विद्यापीठातील किमान पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावी. अर्जदाराचे इंग्रजी किंवा फ्रेंच या दोन्हींपकी एका भाषेवर प्रभुत्व असावे. तसेच त्याला यापूर्वी कधीही कङ किंवा इतर कोणत्याही ग्रीक संस्थेची अथवा सरकारची कोणतीही शिष्यवृत्ती मिळालेली नसावी. अर्ज करतेवेळी अर्जदाराचे वय ३५ पेक्षा जास्त असू नये.
अर्ज प्रक्रिया
संस्थेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांनी त्यांचा अर्ज त्यांच्या देशातील ग्रीक दूतावासात जमा करावा. या अर्जासोबत अर्जदाराला त्याचे शिक्षण व शिक्षणेतर उपक्रम इत्यादी बाबींची माहिती देणारा सीव्ही., नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र, दोन शैक्षणिक तज्ज्ञांची शिफारसपत्रे, अर्जदाराच्या शैक्षणिक पात्रतेची म्हणजेच पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सर्व ट्रान्सक्रिप्ट्स्, अर्जदाराचे इंग्रजी किंवा फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व दाखवणारे प्रशस्तीपत्र आणि पीएच.डी. किंवा पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला त्याचा संशोधन प्रबंध ( फी२ीं१ूँ ळँी२्र२) इत्यादी कागदपत्रे जोडावी लागतील.
अंतिम मुदत
अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २६ जुल २०१३ आहे.
महत्त्वाचा दुवा
ँ३३स्र्://६६६.्र‘८.ॠ१/                             ल्ल
्र३२स्र्१ं३ँंेी२ँ@ॠें्र’.ूे 

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Higher education in greece