या घटकातील मूळ संकल्पना आहे मनुष्यबळाचा विकास. मनुष्यबळाची कल्पना आधी समजून घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ‘उत्पादक व कुशल मनुष्यबळ’ ही संकल्पना लक्षात घ्यावी. ‘कार्यकारी’ लोकसंख्या म्हणजे मनुष्यबळ असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. यासाठी आधी लोकसंख्येची वैशिष्टय़े समजून घ्यायला हवीत. जनगणना २०११ अहवालाचा अभ्यास कशा प्रकारे करावा याची चर्चा यापूर्वीच आपण केली आहे. देशाची व महाराष्ट्राची २००१ सालची जनगणनासुद्धा या दृष्टीने महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या मुद्दय़ांबाबत २००१ व २०११ सालच्या स्थितीची तुलना करणारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. २००१ व २०११ सालचा तुलनात्मक तक्ता केल्यास हे मुद्दे लक्षात ठेवणे सोपे जाईल. रोजगाराबाबतच्या संकल्पना, व्याख्या समजून घ्यायला हव्यात. मागे चर्चा केल्यानुसार त्यातील तथ्यात्मक बाबी, आकडेवारी व टक्केवारीचा अभ्यास केलेला असल्यास त्याची विश्लेषणात्मक अभ्यासात मदत होते.
मनुष्यबळ विकासाची गरज व आवश्यकता याकडे राष्ट्रीय तसेच व्यक्तिगत दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमामध्ये मनुष्यबळ विकासाचे चार मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत- शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास. यापकी पहिल्या दोन मुद्दय़ांचा विचार या लेखामध्ये करूया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा