बँकेत लिपिकाची नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने देशभरातील राष्ट्रीय बँकांमध्ये एकूण ५८५८ लिपिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. या भरतीद्वारे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक मध्ये एकूण ५८५८ पैकी रिक्त पदे भरली जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन ने ११ जुलै २०२१ रोजी भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. ज्यासाठी उमेदवार १ ऑगस्ट २०२१पर्यंत अर्ज सादर करू शकतात. आता आयबीपीएसने पदांसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे.

२७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा

अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासंदर्भात जारी केलेल्या नोटिसीनुसार उमेदवार ७ ऑक्टोबरपासून या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबरपर्यंत आहे. याशिवाय, परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख देखील २७ आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ibpsonline.ibps.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ibps clerk recruitment 2021 application reopened for 5858 vacancies in banks online registration from 7 october ttg