वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सीईटी परीक्षेत यंदापासून मोठे बदल अपेक्षित आहेत. या परीक्षांच्या बदलत्या स्वरूपाची सविस्तर ओळख  करून देणारे साप्ताहिक सदर-

राज्यातल्या गुणवान विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्याशाखांकडे प्रामुख्याने ओढा असतो. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या प्रवेश परीक्षेला- एमएचटी- सीईटी परीक्षेला गतवर्षी राज्यभरात तब्बल तीन लाख विद्यार्थी बसले होते, ज्यापैकी एक लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय एमएचटी- सीईटी आणि उर्वरित अडीच लाख विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी एमएचटी- सीईटी परीक्षा दिली. सुमारे एक लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी दोन्हीही परीक्षा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर हेही लक्षात घेणे आवश्यक ठरते की, राज्यातील ३०० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सुमारे दीड लाख प्रवेशजागा आहेत, तर १८ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी केवळ २०६० प्रवेश जागा आहेत.
२००४ पासून २०१२ सालादरम्यानच्या टप्प्यावर नजर टाकली तर असे दिसून येते की, या कालावधीत एका स्थिर प्रवेश परीक्षा पद्धतीनुसार राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एमएचटी – सीईटी आणि एआयईईई परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमएचटी- सीईटी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या असोसिएट सीईटी परीक्षेच्या आधारे प्रवेश मिळत असे. या कालावधीत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांने बारावीच्या बोर्ड परीक्षेत किती गुण संपादन केले, याला फारसे महत्त्व नव्हते. मात्र, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ठरणाऱ्या सीईटी परीक्षेमध्ये यंदाच्या वर्षांपासून आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक ठरणाऱ्या सीईटी परीक्षेमध्ये पुढच्या वर्षांपासून म्हणजेच- २०१४ सालापासून मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
यंदाच्या वर्षांपासून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि सीबीएसई यांनी मिळून देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी नीट (एनईईटी) नामक एकमेव राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एमएचटी-सीईटी आणि इतर राज्यात सुरू असलेल्या सीईटी परीक्षांऐवजी आता नीट (एनईईटी) परीक्षा घेण्यात येईल. त्यामुळे, वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश संपादन करण्यासाठी यंदापासून- २०१३ वर्षांपासून नीट (एनईईटी) परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांना गरजेचे ठरते. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षांपासून – म्हणजेच २०१४ सालापासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, आयआयटी आणि एनआयटी कौन्सिलने मिळून जेईई नामक एकमेव राष्ट्रीय प्रवेश परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. जेईई ही परीक्षासुद्धा सध्या सुरू असलेल्या एआयईईई, एमएचटी-सीईटी यासारख्या परीक्षांऐवजी घेण्यात येणार आहे. ‘जेईई- मेन्स’ ही परीक्षा एप्रिल २०१४ मध्ये आणि ‘जेईई- अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा जून २०१४ मध्ये घेतली जाईल. १६ आयआयटी संस्थांमध्ये ‘जेईई- अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेत विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या गुणांनुसार प्रवेश दिला जाईल. उर्वरित एनआयटी, आयआयआयटी, आयआयएसटी, डीए-आयआयसीटी तसेच राज्य पातळीवरील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘जेईई- मेन्स’च्या आधारे प्रवेश देण्यात येईल.
विद्यार्थी- पालकांनी या बदलांच्या मुख्य भागाकडे लक्ष द्यायला हवे. तो असा की, एनईईटी आणि जेईई या परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप आणि काठिण्यपातळी ही ‘एमएच-सीईटी’च्या तुलनेत अत्यंत वेगळी आहे. नीट (एनईईटी) किंवा जेईईचा अभ्यासक्रम हा ‘सीबीएसई’च्या अकरावी आणि बारावीच्या एकत्रित अभ्यासक्रमावर आधारित आहे, जो ‘एमएच-सीईटी’च्या अभ्यासक्रमाच्या दुप्पट आहे. ‘एमएच-सीईटी’ परीक्षेचा अभ्यासक्रम राज्यस्तरीय बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित होता. एनईईटी आणि जेईई या प्रवेशपरीक्षांमध्ये बहुपर्यायी प्रश्न असून गुणांकनामध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. उलटपक्षी, एमएच-सीईटीमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत अनुसरली जात नसे.
एनईईटी आणि जेईई परीक्षांमध्ये प्रश्न हे खरे सांगायचे तर फक्त सूत्र बदलांपेक्षा संकल्पना आणि उपयोजन या आधारे विचारले जाणे अपेक्षित आहे. त्याउलट, ‘एमएच-सीईटी’मध्ये माहितीच्या आणि सूत्रांच्या आधारे प्रश्न विचारले जात – जे तुलनेने सोप्या पद्धतीचे होते. परीक्षेच्या नव्या स्वरूपानुसार, एनईईटी आणि जेईईमध्ये नैपुण्य मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये वेगळ्या प्रकारे अभ्यास करणे नितांत आवश्यक ठरते.
यंदाच्या वर्षांत (२०१३ साली) राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी आणि जेईई मेन्स या परीक्षांचे गुण ग्राह्य़ धरले जाणार असून, बारावीच्या गुणांना महत्त्व दिले जाणार नाही. मात्र, पुढच्या वर्षांपासून (२०१४ सालापासून) राज्यातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बारावी बोर्ड परीक्षांना – त्यातील पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयातील प्राप्त गुणांना मिळणारे महत्त्व प्राप्त होणार आहे, हा सर्वात मोठा बदल मानला जातो. पुढच्या वर्षांपासून (२०१४ सालापासून) बारावी बोर्डाच्या परीक्षांमध्ये पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात मिळणारे गुण व जेईई मेन्सचे गुण यांच्या गुणांना ५० – ५० टक्के महत्त्व दिले जाणार आहे. एकत्रित गुणांमध्ये बारावी बोर्डाचे मार्क धरले जातील.
राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांने बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे ही अर्हता (ी’्रॠ्र्रु’्र३८) असेल. मात्र, देशातील विविध अशा ४२ परीक्षा मंडळांच्या समानीकरणाच्या (नॉर्मलायझेशन) आधारे असे करताना विविध अडचणी उद्भवू शकतात. जिथे वैद्यकीय प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होतो, तिथे बारावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे ही प्रवेशासाठीची अर्हता (ी’्रॠ्र्रु’्र३८) असेल, मात्र प्रवेश हा केवळ नीट (एनईईटी)परीक्षेतील गुणांच्या आधारावरच दिला जाण्याची शक्यता आहे. यानुसार, बारावी बोर्ड हे वैद्यकीय आणि देशपातळीवरील इंजिनीयरिंग महाविद्यालयांतील प्रवेशासाठी इतके महत्त्वपूर्ण नसून राज्यातील इंजिनीअरिंग महाविद्यालयांतील प्रवेशासाठीही बोर्ड परीक्षांमधील मिळालेले गुण हे ५० टक्के महत्त्वाचे ठरतात.
म्हणूनच वैद्यकीय पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी यंदा आणि अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी- २०१४ सालापासून सीईटी परीक्षांमध्ये संभाव्य मोठे बदल होणार आहेत, हे लक्षात घेऊन त्यानुसार मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि गुणांकन पद्धतीतील नव्या बदलांनुसार विद्यार्थ्यांनी योग्य तयारी करणे गरजेचे ठरते.   

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?

संचालक, आयआयटीयन्स, प्रशिक्षण केंद्र, पुणे</strong>
mdurgesh@yahoo.com