India Post Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. भारतीय टपाल विभागाने दिल्ली पोस्टल सर्कलमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी उमेदवार १५ मार्च २०२२ पूर्वी अर्ज करू शकतात. या पदांसाठी उमेदवारांनी नोंदणीकृत पोस्टद्वारेच अर्ज करावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्मचारी कार चालकाच्या २९ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. १५ पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी, ३ पदे अनुसूचित जाती, ८ पदे OBC आणि ३ पदे EWS कोट्यासाठी राखीव आहेत.

पात्रता काय?

अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा. तसेच, उमेदवाराला अवजड वाहने चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा.

वायोमार्यदा काय?

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट आहे.

निवड प्रक्रिया काय आहे?

स्किल टेस्टद्वारे स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India post recruitment 2022 job opportunity for 10th pass learn more ttg