Indian Air Force Recruitment 2021: भारतीय हवाई दलाने विविध गट A पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय हवाई दल भर्ती २०२१ साठी अधिकृत वेबसाइट careerindianairforce.cdac.in किंवा afcat.cdac.in द्वारे ३० डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी १ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

भारतीय हवाई दल AFCAT एंट्रीद्वारे फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल और नॉन टेक्निकल) शाखांमध्ये ३१७ पदांची भरती करेल. याशिवाय एनसीसी स्पेशल एंट्री अंतर्गत CDSE रिक्त पदे आणि AFCAT रिक्त पदांपैकी १०% जागांची भरती केली जाईल.

पात्रता काय आहे?

अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवाराचे वय फ्लाइंग ब्रँचमधील भरतीसाठी २० ते २४ वर्षे आणि ग्राउंड ड्युटी शाखेत भरतीसाठी २० ते २६ वर्षे दरम्यान असावे. याशिवाय, फ्लाइंग ब्रँच भरतीसाठी उमेदवार किमान ५०% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह १२वी उत्तीर्ण असावा. तसेच, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे, त्यामुळे उमेदवार तपशीलवार माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की AFCAT 01/2022 साठी ऑनलाइन परीक्षा १२ फेब्रुवारी, १३ फेब्रुवारी आणि १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार IAF AFCAT एंट्री २०२१ साठी अधिकृत वेबसाइटद्वारे ३० डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना रु. २५० अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

Story img Loader