भारतीय हवाई दलाने विविध हवाई दल स्टेशन/युनिटमध्ये गट सी नागरी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार आयएएफ ग्रुप सी भरती २०२१ साठी त्यांचे अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात जारी केल्यापासून ३० दिवसांच्या आत पाठवू शकतात.
कोणत्या पदांवर होणार भरती?
या प्रक्रियेद्वारे भारतीय हवाई दलात लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) ची १२ पदे, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) ची १८ पदे, अधीक्षक (स्टोअर) १ पद, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरची ४५ पदे, कुकची ५ पदे, सुताराच्या १ पदासाठी आणि फायरमनच्या १ पदासाठी भरती केली जाईल. अधीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स स्तर ४ अंतर्गत वेतन दिले जाईल. तर, इतर पदांसाठी, पगार स्तर २ अंतर्गत असेल.
( हे ही वाचा: सेकंड हँड कारची मागणी वाढली! २५ टक्क्यांनी वाढल्या किंमती, जाणून घ्या कारण )
पात्रता काय?
अधिकृत अधिसूचनेनुसार, लोअर डिव्हिजन क्लर्कच्या पदासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असावा. तर, १० वी पास कुक, सुतार, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फायरमन आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अधीक्षक पदावरील भरतीसाठी उमेदवार पदवीधर असावा. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, गट क मधील विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
( हे ही वाचा: Ducati भारतात लॉंच करणार ‘ही’ शानदार बाईक; जाणून घ्या काय असतील फीचर्स आणि किंमत )
काय असेल निवड प्रक्रिया?
भारतीय हवाई दलातील गट सी पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक/शारीरिक/कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. सर्व इच्छुक उमेदवार आय ए एफ गट सी भरती २०२१ साठी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात आणि इतर आवश्यक कागदपत्रे विहित वेळेत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट तपासा.