भारतीय सैन्य दलात कायदा विषयातील महिला पदवीधरांसाठी खालील संधी उपलब्ध आहेत-
जागांची संख्या : उपलब्ध जागांची संख्या चार.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार महिलांनी बारावीनंतर पाच वर्षांचा अथवा पदवीनंतर तीन वर्षांचा कायदा विषयातील पदवी अभ्यासक्रम कमीतकमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा आणि त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असाव्यात.
वयोगट : अर्जदार २१ ते २७ वर्षे वयोगटातील असाव्यात.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड सैनिक निवड मंडळातर्फे लेखी निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल. त्यानंतर निवडक उमेदवारांना सैन्य दल निवड मंडळातर्फे शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या महिलांना सैन्य दलाच्या कायदा शाखेत लेफ्टनंट म्हणून दरमहा १५,६०० रु.च्या मूळ वेतनावर नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना सैन्य दलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, फायदे व भविष्यातील बढतीच्या संधीही उपलब्ध होतील.                                                    
अधिक माहिती – या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची कायदा विभागाची रोजगारविषयक जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख  १९ सप्टेंबर २०१४ आहे.

Story img Loader