भारतीय लष्करात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्याने सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर (SSC ऑफिसर) च्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे.

याशिवाय, उमेदवार http://www.amcsscentry.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे इंडियन आर्मी रिक्रूटमेंट २०२१ अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २०० पदे भरली जातील.

( हे ही वाचा: Maharashtra SSC Board Exam 2022: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी सुरू, असा करा अर्ज )

भरतीसाठी महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – १३ नोव्हेंबर २०२१

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२१

भरतीसाठी रिक्त जागा तपशील

शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर (SSC ऑफिसर) – २०० पदे

पुरुष – १८० पदे

महिला – २० पदे

भरतीसाठी पात्रता निकष

उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस / पीजी डिप्लोमा / पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे.

भरतीसाठी वयोमर्यादा

एमबीबीएस – ३० वर्षे

पीजी पदवी – ३५ वर्षे

Story img Loader