Indian Army Recruitment 2022: भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत अधिकाऱ्यांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत पुरुषांसाठी ५९ व्या आणि महिलांसाठी ३० व्या अभ्यासक्रमासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय सैन्य SSC भरती २०२२ साठी उमेदवार ८ मार्च २०२२ ते ८ एप्रिल २०२२ या कालावधीत joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण करू शकतो अर्ज ?

अधिकाऱ्यांच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केल्यानंतर उमेदवार पात्रता संबंधित माहिती तपासू शकतात.

(हे ही वाचा: Railway Recruitment 2022: रेल्वेत नोकरीची मोठी संधी, जाणून घ्या संबंधित तपशील)

वयोमर्यादा किती?

उमेदवाराचे वय २० ते २७ वर्षे दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत असेल.

निवडप्रक्रिया कशी?

शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित केलेल्या उमेदवारांना जॉईनिंग लेटरसाठी बोलावले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच उमेदवारांना अधिकारी म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाईल.

(हे ही वाचा: India Post Recruitment 2022: दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक)

अर्ज कसा करायचा?

joinindianarmy.nic.in या भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मुख्यपृष्ठावरील अधिकारी निवड विभागात दिलेल्या ‘अधिकारी प्रवेश अर्ज/लॉग इन’ वर क्लिक करा.

उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल.

त्यानंतर उमेदवार लॉग इन करून अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊ शकता.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army recruitment 2022 for officer posts women can also apply ttg