Indian Army Recruitment 2022: तरुणांना सैन्यात नोकरीची चांगली संधी आहे. भारतीय सैन्यातील सध्याच्या भरतीची माहिती खाली शेअर केली जात आहे. ज्यासाठी ते विहित नमुन्यात वेळेत अर्ज करू शकतात. भारतीय सैन्याने एसएससी तांत्रिक अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि ६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज सबमिट करू शकतात. एकूण १७५ पदे भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय लष्कराने मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी ११ मार्च २०२२ पर्यंत ऑफलाइन अर्ज सबमिट करू शकतात. एकूण ७ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगार)

भारतीय सैन्याने आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये वॉचमन, कुक, बार्बर, धोबी यासह विविध पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार १५ मार्च २०२२ पर्यंत joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सबमिट करू शकतात. एकूण ४७ पदांची भरती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army recruitment 2022 great opportunity for 10th 12th pass ttg