Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्याच्या मुख्यालयातील ग्रुप सी पदांसाठी भरती निघाली आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रक्रियेतून ग्रुप सी अंतर्गत ९६ जागा रिक्त आहेत. यातील ५१ जागा या खुल्या प्रवर्गासाठी तर ९ पदे अनुसूचित जाती, ५ पदे अनुसूचित जमाती व अन्य मागासवर्गीय गटांसाठी २२ जागा आरक्षित असणार आहे. आर्थिक दुर्बल गटासाठी ९ पदे राखीव ठेवण्यात येणार आहे.
ग्रुप सी अंतर्गत पदांसाठी पात्रता निकष
ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी किमान दहावी अन्यथा समान इयत्तेत उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. उमेदवारांचे वय किमान १८ तर कमाल २५ वर्षे या दरम्यान असावे. या प्रक्रियेत निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना लेव्हल १ च्या अंतर्गत वेतन योजनांचा लाभ दिला जाईल. हवालदार, स्वच्छता कर्मचारी आणि ट्रेड्समॅन पदावर भरती होणार आहे.
ग्रुप सी अंतर्गत पदांसाठी भरती प्रक्रिया
दरम्यान ग्रुप सी अंतर्गत पदांसाठी भरती प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. निवडप्रक्रियेत सामान्य ज्ञान व रिजनिंग, सामान्य इंग्लिश आणि गणिती ऍप्टिट्यूड या विषयांवर लिखित परीक्षा होणार आहे. ही परीक्षा १५० गुणांसाठी १५० प्रश्न विचारले जाणार आहे. HQ सेंट्रल ग्रुप कमांड C रिक्रुटमेंट 2022 संदर्भात अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाईट तपासून पहा.