Indian Bank Recruitment 2022: इंडियन बँकेने देशभरातून स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच संपणार आहे. उमेदवार १४ जूनपर्यंत अधिकृत वेबसाइट indianbank.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. गट १, गट २, गट ३, गट ४, गट ५, गट ६ आणि गट ७ अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक म्हणून उमेदवारांची भरती केली जाईल. यापैकी, नवीन उमेदवार सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज करू शकतात, तर अनुभवी उमेदवार वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक पदांसाठी पात्र आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन बँक रिक्रूटमेंट २०२२ अंतर्गत, स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एकूण ३१२ पदांची भरती केली जाईल. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (क्रेडिट) १० पदे, व्यवस्थापक (क्रेडिट) ५० पदे, सहाय्यक व्यवस्थापक (लेखा) ५ पदे आणि सहाय्यक व्यवस्थापक (औद्योगिक विकास अधिकारी) च्या १५० पदांचा समावेश आहे. अधिकृत अधिसूचनेद्वारे उमेदवार अधिक पोस्ट संबंधित तपशील तपासू शकतात.

(हे ही वाचा: ECIL Recruitment 2022: नोकरीची संधी!! पगार ३७,००००; जाणून घ्या अधिक तपशील)

अनुभव किती असावा?

मुख्य व्यवस्थापक पदासाठी ७ वर्षांचा अनुभव मागितला आहे. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५ वर्षांचा अनुभव असावा. मॅनेजर, फ्रेशर या पदांसाठी ३ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करू शकतात.

(हे ही वाचा: एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पोस्ट, पात्रता आणि पगार)

पगार किती?

स्केल I – ३६,००० ते ६३,८४० रुपये

स्केल II – ४८,१७० ते ६९,८१० रुपये

स्केल III -६३,८४० ते ७८,२३० रुपये

स्केल IV – ७६,०१० ते ८९,८९० रुपये

(हे ही वाचा: ISI Recruitment 2022: इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी; पगार ५४ हजार)

कोण अर्ज करू शकतं?

या भरती मोहिमेअंतर्गत येणाऱ्या सर्व विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा भिन्न आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचनेत नमूद केल्यानुसार पात्रता तपशील तपासण्याचा सल्ला दिला जातो.

(हे ही वाचा:Railway Recruitment 2022: कनिष्ठ अनुवादक पदांसाठी अधिसूचना जारी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज)

निवड कशी केली जाईल?

या भरतीसाठी उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येवर आधारित, बँक निवडीची पद्धत ठरवेल. ज्यामध्ये मुलाखतीनंतर अर्जांची शॉर्टलिस्टिंग आणि लेखी किंवा ऑनलाइन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड त्यानंतर मुलाखत होईल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian bank recruitment 2022 for 300 plus specialist officers apply online ttg
Show comments