केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केंद्र सरकारच्या वन मंत्रालय विभागांतर्गत अधिकारी पदावर नेमणूक करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या भारतीय वन-सेवा परीक्षा २०१३ साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत –
उपलब्ध जागांची संख्या व तपशील : या स्पर्धा परीक्षेद्वारा निवड करावयाच्या एकूण जागांची संख्या ८५ असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी पशुविज्ञान वा पशुवैद्यक, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, वनशास्त्र वा अभियांत्रिकी या विषयांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवडप्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २६ मे २०१३ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवडप्रक्रिया, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जदारांनी आपल्या अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून १०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा तिच्या सहयोगी बँकेत रोखीने व चलनद्वारा भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यज’च्या १६ ते २२ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय वन-सेवा परीक्षेची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०१३.
सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे असणाऱ्या ज्या पात्रताधारक पदवीधर उमेदवारांना केंद्र सरकारच्या सेवेत थेट वन-अधिकारी म्हणून आपली करिअर-कारकीर्द सुरू करायची असेल अशांनी या संधीचा जरूर विचार करावा.
भारतीय वन सेवा परीक्षा २०१३
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केंद्र सरकारच्या वन मंत्रालय विभागांतर्गत अधिकारी पदावर नेमणूक करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या भारतीय वन-सेवा परीक्षा २०१३ साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत -
![भारतीय वन सेवा परीक्षा २०१३](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/03/cv092.jpg?w=1024)
आणखी वाचा
First published on: 01-04-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian forest service exam