इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझमतर्फे विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या संशोधनपर पीएच.डी.साठी नोंदणी करण्याकरिता खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी फिजिक्स, अप्लाइड जिऑलॉजी, पर्यावरण विज्ञान, जिओ-फिजिक्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रता कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी बी.एस्सी. पदवी गणित, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन व चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय त्यांनी ‘नेट’, ‘गेट’, ‘इन्स्पायर’ यांसारखी विशेष पात्रता प्राप्त केलेली असावी.
उमेदवारांची संख्या : या योजनेअंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या २५ आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २५ वर्षांहून अधिक नसावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
पाठय़वेतन, लाभ व सवलती : योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे पाठय़वेतन, पुस्तकांच्या खर्चापोटी वार्षिक ६००० रु. व त्याशिवाय निवासस्थानाची सोय उपलब्ध करून देता येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझमच्या http://iigm.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज केल्यावर अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम् प्लॉट ५, सेक्टर-१८, कळंबोली महामार्गाजवळ, नवीन पनवेल (पश्चिम), नवी मुंबई- ४१० २१८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ मे २०१४.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा