भारतीय नौदलात १०० अग्निवीर एमआर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये २० जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. ही प्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. http://www.joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर १७ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
केवळ अविवाहित व्यक्तींनाच या पदासाठी अर्ज करता येणार आहे. भारतीय नौदलाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये असे नमुद करण्यात आले की, ‘भारतीय नौदलात अग्निवीर पदासाठी ४ वर्षांसाठी १९५७ च्या नौदल कायद्यानुसार होईल.’
आणखी वाचा – यूपीएससीची तयारी : यूपीएससी परीक्षा : गरज कौशल्य विकासाची
शैक्षणिक पात्रता:
अग्निवीर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सरकार द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
उमेदवाराची जन्म १ मे २००२ ते ३१ ऑक्टोबर २००५ यामधील असावा.
परीक्षा फी
उमेदवारांना ५५० रुपये परीक्षा फी भरावी लागेल. यासह नेट बँकिंग, डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड यांवरील पेमेंटसाठी १८ टक्के जीएसटी द्यावा लागेल.
निवड प्रक्रिया
ऑनलाईन शॉर्टलिस्टिंग टेस्ट
लेखी परीक्षा (PFT and Initial Medical)
वैद्यकीय भरतीसाठी अंतिम परीक्षा