भारतीय नौदलातील दहावी पास ही तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. नौदलाने मॅट्रिक्युलेशन सेलर एंट्रीद्वारे ३०० पदांची भरती केली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होईल. विशेष बाब म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०२१ आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना फक्त ५ दिवसांचा अवधी मिळेल. ऑनलाइन परीक्षा, शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – २९ ऑक्टोबर २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर २०२१

भरती परीक्षेची तारीख – अजून ठरलेली नाही

प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख – एप्रिल २०२२

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाले तर उमेदवारांची जन्मतारीख १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००५ दरम्यान असावी. याबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही भारतीय नौदलाच्या वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना पाहू शकता.

अर्ज फी

नौदलाच्या या पदांवरील अर्ज सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी विनामूल्य आहेत. अर्जासाठी कोणालाही कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

असा अर्ज करू शकता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत भरती वेबसाइट http://www.joinindiannavy.gov.in ला भेट द्यावी लागेल. तुम्हाला या भरती अधिसूचना आणि अर्जाशी संबंधित तपशीलवार माहिती वेबसाइटवर मिळेल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy recruitment 2021 mr job offer 2021 notification application registration 300 vacancies navy job sarkari naukri ttg