भारतीय नौदलात नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सामान्य सेवेतील अधिकारी, नौदल निरीक्षक संवर्ग, हवाई वाहतूक नियंत्रक, निरीक्षक, पायलट, लॉजिस्टिक, शिक्षण आणि अभियांत्रिकी शाखेतील पदांसाठी भरती केली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार हे या पदांसाठी अर्ज करू शकतात, ते भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवार या पदांसाठी १२ मार्च पर्यंत अर्ज भरू शकतात.

याशिवाय, उमेदवार https://www.joinindiannavy.gov.in/en/account या लिंकवर थेट क्लिक करून या पदांसाठी सहज अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही http://www.davp.nic.in/WriteReadData/ADS/eng_10701 या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना पाहू शकता. या भरती मोहिमेद्वारे एकूण १५५ पदे भरली जातील.

Raigad seven constituencies , Raigad ,
रायगडमधील सात मतदारसंघांत ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
candidates Bhayander, Rebellion BJP,
भाईंदरमध्ये १७ उमेदवार रिंगणात, ६ जणांची माघार, भाजपमधील बंडखोरी शमली, गीता जैन यांना ‘फलंदाज’ चिन्ह
BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
Despite objections applications of MLA Rohit Pawar and MLA Ram Shinde were approved karjat news
हरकतीनंतरही आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांचे अर्ज मंजूर; मात्र हरकतीचा मुद्दा न्यायालयात जाणार
Nagpur South West Assembly Constituency 2024 Election Commission accepted 19 applications and rejected 18 applications print politics news
फडणवीसांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धांचे निम्मे अर्ज बाद
Assembly Elections 2024 Legislature BJP Raju Parve Nagpur
खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा दिला, आता आमदारकीची अपेक्षा असताना भाजपकडून ऐनवेळी…

भरतीच्या महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २५ फेब्रुवारी २०२२

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ मार्च २०२२

रिक्त पदे

एकूण पदे: – १५५

सामान्य सेवा [GS(X)] जल संवर्ग – ४०

नौदल निरीक्षक संवर्ग (NAIC) – ६

हवाई वाहतूक नियंत्रक (ATC) – ६

निरीक्षक – ८

पायलट – १५

लॉजिस्टिक – १८

शिक्षण – १७

अभियांत्रिकी शाखा
(GS) – ४५

शैक्षणिक पात्रता

सामान्य सेवा [GS(X)] हायड्रो कॅडर या पदावर काम करण्यासाठी उमेदवार ६०% गुणांसह B.Tech उत्तीर्ण असावा.

नौदल निरीक्षक संवर्ग (NAIC) या पदासाठी उमेदवारांनी इंग्रजीमध्ये ६०% गुणांसह १० वी आणि १२ वी उत्तीर्ण केलेली असावी.

मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / उपकरणे आणि नियंत्रण / नियंत्रण अभियांत्रिकी / उत्पादन / औद्योगिक उत्पादन किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – BE/B.Tech कोणत्याही शाखेतील किमान ६०% गुणांसह. तसेच, उमेदवार हा इंग्रजीमध्ये ६०% गुणांसह १०वी आणि १२वी उत्तीर्ण केलेलं असावं

निरीक्षक- BE/B.Tech कोणत्याही शाखेतील किमान ६०% गुणांसह. तसेच, इंग्रजीमध्ये ६०% गुणांसह १०वी आणि १२वी उत्तीर्ण केलेलं असावं.

पायलट- BE/B.Tech कोणत्याही शाखेतील किमान ६०% गुणांसह. तसेच, इंग्रजीमध्ये ६०% गुणांसह १०वी आणि १२वी उत्तीर्ण केलेलं असावं.

लॉजिस्टिक- उमेदवारांकडे B.Tech, MBA आणि B.Sc/B.Com/B.Sc IT पदवी असावी. तसेच ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेलं असावं.

अभियांत्रिकी शाखा (GS) – मेकॅनिकल/मेकॅनिकल, मरीन, इन्स्ट्रुमेंटेशन, उत्पादन, एरोनॉटिकल, औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन, नियंत्रण अभियांत्रिकी, किमान ६०% गुणांसह तर ऑटोमेशनसह एरोस्पेस, ऑटोमोबाईल, धातुकर्म, मेकॅट्रॉनिक्स या सर्व पदासाठी उमेदवार हा BE/B.Tech in Instrumentation & Control या पदवीने उत्तीर्ण असावा.

निवड प्रक्रिया

अर्जांची पाहणी

SSB मुलाखत

वैद्यकीय चाचणी

अंतिम गुणवत्ता यादी

या पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाईल.