भारतात जागतिक दर्जाच्या सैनिक प्रशिक्षण शाळा आहेत. मुख्य म्हणजे भारतीय भूदल, नौदल, हवाई दल या तीनही विभागांसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण अकादमी अस्तित्वात आहेत. भारतीय प्रशिक्षार्थीबरोबरच भारताच्या मित्र राष्ट्रांच्या विद्यार्थ्यांनाही येथे प्रशिक्षण दिले जाते. या सनिक शाळांतून सनिक प्रशिक्षणाव्यतिरिक्त नेतृत्व गुण, नतिक मूल्ये, मानसिक आणि शारीरिक कणखरपणा बिंबवला जातो. विद्यार्थ्यांच्या निरोगी शरीर आणि प्रसन्न मानसिकतेसाठी क्रीडा आणि खेळ यांना पुरेपूर महत्त्व दिले जाते.

नॅशनल डिफेन्स अकादमी
देशातील प्रसिद्ध सनिक प्रशिक्षण शाळांपकी एक म्हणजे पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकादमी- म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी. येथे प्रशिक्षणाद्वारे युवा, उमद्या मुलांतून कणखर नेतृत्व घडवले जाते.
सुदान देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात भारतीय सन्याने बजावलेल्या कामगिरीसाठी भारत सरकारला ७० हजार सुदानी पाउण्ड्स बक्षिसाखातर देण्यात आले. या रकमेचा वापर सरकारने एन.डी.ए. संस्थेच्या उभारणीसाठी आणि बांधकामासाठी केला. ७ डिसेंबर १९५४ रोजी संस्थेची स्थापना झाली आणि १६ जानेवारी १९५५ रोजी एअर फोर्स अकादमी व एन.डी.ए. यांचा ‘जॉइंट सर्व्हिस विंग प्रोग्राम’ पार पडला.
नॅशनल डिफेन्स अकादमी या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थीच्या सर्वागीण विकासासाठी बहुविध सोयी उपलब्ध आहेत. प्रशस्त आणि सुस्थितीत असलेले वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, ऑलिम्पिक स्पर्धाच्या धर्तीवर बांधलेले पोहण्याचे तलाव, व्यायामशाळा, पोलोची दोन मदाने, फुटबॉलची ३२ मदाने, क्रिकेटचे प्रेक्षागार आणि स्कॉश, टेनिस खेळाची अनेक क्रीडांगणे अकादमीत आहेत.
एन.डी.ए.तील शैक्षणिक वर्ष जानेवारी ते मेपर्यंत ‘स्प्रिंग टर्म’ आणि जुल ते डिसेंबपर्यंत ‘ऑटम टर्म.’ अशा दोन सत्रांत विभागलेले असते. एन.डी.ए.त प्रशिक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांना सहा सहामाही सत्रे यशस्वीरीत्या पूर्ण करावी लागते.
ही संस्था जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी संलग्न असून प्रशिक्षणाअंती विद्यार्थ्यांना, बी.ए./बी.एस.सी. किंवा बी.एस.सी.(कॉम्प्युटर सायन्स) या पदव्या प्रदान केल्या जातात.
एन.डी.ए. शिक्षणसंस्थेतील प्रशिक्षणार्थी शिस्तबद्ध आयुष्य जगतात. कठोर नियमांच्या काटेकोर पालनातूनच देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारे नेतृत्व त्यांच्यात तयार होते. प्रशिक्षणाअंतर्गत या विद्यार्थ्यांना अनेक धाडसी क्रीडाप्रकार शिकवले जातात. उदा. अश्वारोहण, रिव्हर राफ्टिंग इत्यादी. विद्यार्थी आपल्या आवडीचे खेळ संस्थेत खेळू शकतात. या संस्थेची प्रवेश परीक्षा वर्षांतून दोनदा घेतली जाते. ७०१५ एकर जागेवर पसरलेली ही संस्था पुणे शहरापासून १७ कि.मी. अंतरावर आहे.

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?
Heritage walk for voting awareness with the help of Municipal Corporation Mumbai print news
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘हेरिटेज वॉक’, महापालिकेचा संस्थेच्या मदतीने अनोखा उपक्रम
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

इंडिअन मिलिटरी अकादमी
ज्या संस्थेचे नाव ऐकताच आपल्या मनात साहसी थरार उत्पन्न होतो, ती इंडिअन मिलिटरी अ‍ॅकॅडमी डेहराडून येथे आहे.
१ ऑक्टोबर १९३२ रोजी ४० विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे (जंटलमन कॅडेट) प्रशिक्षण सुरू झाले होते. ब्रिगेडिअर एल.पी. कोलिन्स हे संस्थेचे पहिले कमांडंट होते. संस्थेच्या पहिल्या तुकडीतील पहिला यशस्वी कॅडेट म्हणजे फिल्डमार्शल सॅम माणेकशॉ. विद्यार्थ्यांत नेतृत्व गुण बाणवले जावेत, यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा त्यांना सक्षम करणे हे आय.एम.ए.तील प्रशिक्षणाचे प्रमुख ध्येय आहे. या अंतर्गत शारीरिक शिक्षण, कवायती, विविध शस्त्रे चालवण्याचे तंत्रशुद्ध शिक्षण आणि उत्तम नेतृत्व घडवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. जास्तीत जास्त भर खेळांसाठीच्या सोयीसुविधा पुरवण्यावर दिला जातो. संस्थेत खुली मदाने तसेच बंदिस्त क्रीडागृहे उपलब्ध आहेत. संस्थेत पोलो खेळासाठीचे मदानही आहे. या प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावी आयुष्यात, आपल्या देशाचा सन्मान आणि सुरक्षितता राखण्यासाठी पुढील नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. देशाचे हित, सन्मान आणि सुरक्षितता या गोष्टींना आयुष्यात प्राधान्यक्रम असणे अपेक्षित असते. त्यानंतर तुम्ही नेतृत्व करीत असलेल्या व्यक्तींच्या हिताचे, सन्मानाचे आणि कल्याणाचे रक्षण करणे हे कर्तव्य मानले जाते. स्वत:ची सुरक्षितता, कल्याण या गोष्टी नेहमी प्राधान्यक्रमानुसार शेवटी असल्या पाहिजेत.
आय.एम.ए.तील प्रवेशासाठी खालील परीक्षा देता येतात –
० एन.डी.ए. – वर्षांतून दोनदा घेतली जाते.
० सी.डी.एस.ई.- वर्षांतून दोनदा घेतली जाते.
० टी.जी.सी. – टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स वर्षांतून दोनदा चालवला जातो.
हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या प्रशिक्षण संस्थेत प्रभावी योद्धय़ाला आवश्यक अशी बहुअंगी युद्धकौशल्ये अंगी रुजवण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण दिले जाते.

एअरफोर्स अकादमी
भारतीय हवाई दलात भरती होऊन, आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या महत्त्वाकांक्षी युवकांना हवाई दलाच्या फ्लाइंग, टेक्निकल, ग्राउण्ड डय़ुटी शाखांचे पद्धतशीर प्रशिक्षण देण्याचे कार्य एअर फोर्स अकादमी ही संस्था करते.
११ ऑक्टोबर १९६७ रोजी देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या हस्ते संस्थेचा कोनशिला समारंभ पार पडला. भारतीय वायू दलाच्या अधिकाऱ्यांना एकाच छताखाली आवश्यक त्या प्रशिक्षण सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हे संस्थेच्या उभारणीमागील उद्दिष्ट होते. १९७१ मध्ये संस्थेतील प्रत्यक्ष प्रशिक्षण सेवेला सुरुवात झाली आणि आजघडीला सर्वोत्तम स्थानावर असण्याचा मान या संस्थेने पटकावला आहे.
एअर फोर्स अकादमी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या युवक-युवतींतून जबाबदार नेतृत्व घडवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. फ्लाइंग, टेक्निकल, ग्राउण्ड डय़ुटी शाखांचे प्रशिक्षण देण्यासाठी एअर फोर्स अकादमीकडे अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. भारताच्या काही मित्र राष्ट्रांतील विद्यार्थीही या संस्थेत प्रशिक्षित केले जातात. एअर ट्राफिक कंट्रोल विभागाचे शिक्षण देण्यासही ही संस्था सक्षम आहे. प्रशिक्षणाव्यतिरिक्त सन्य दलात कार्यभार सांभाळताना अत्यावश्यक असलेले वर्तनविषयक नियम, शिष्टाचार हेही प्रशिक्षर्थीच्या अंगी बाणवले जातात. युवावर्गाला आधुनिक कला जगताची ओळख करून दिली जाते. येथे प्रामुख्याने खेळ, क्रीडा प्रकारांना महत्त्व दिले जाते.
संस्थेतील प्रवेशासाठी परीक्षा –
० एन.डी.ए. -वर्षांतून दोनदा घेतली जाते.
० सी.डी.एस.ई.- वर्षांतून दोनदा घेतली जाते.
० ए.एफ.सी.ए.टी.- फेब्रुवारी /ऑगस्ट अशी वर्षांतून दोनदा घेतली जाते.
० एन.सी.सी. – या स्पेशल एन्ट्रीसाठी एन.सी.सी. एअर िवग सीनिअर डिव्हिजन सी प्रमाणपत्र आवश्यक .
दुन्डीगल येथे सात हजार एकर परिसरात पसरलेली ही संस्था हैद्राबादपासून २५ कि.मी. अंतरावर स्थित आहे.

इंडियन नेव्हल अकादमी
अरबी समुद्राच्या सान्निध्यात असलेली इंडिअन नेव्हल अकादमी, भारतीय नौदलाच्या तरुण प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्याचे काम करते.
एन.डी.ए. च्या स्थापनेपूर्वी, भारतीय नौदलाचे विद्यार्थी डार्टमाउथ, इंग्लंड येथे चार वर्षांचे प्रशिक्षण घेत असत. एन.डी.ए. प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेनंतर या विद्यार्थ्यांना तेथे प्रशिक्षण दिले जात असे. नौदल सेवेसाठी आवश्यक व्याप्ती असलेले शिक्षण देण्यासाठी १९६९ मध्ये कोचीन येथे इंडिअन नेव्हल अकादमीची उभारणी झाली.
भारतीय नौदल सेवेत रुजू होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, निवड झालेल्या युवक-युवतींना आय.एन.ए. मध्ये दिले जाते. यासाठी संस्थेने निश्चित केलेल्या साचेबद्ध प्रशिक्षणक्रमाचे प्रयोजन केले जाते. ‘कॅडेट एन्ट्री’ अंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी चार वष्रे तर ‘डायरेक्ट एन्ट्री’ अंतर्गत हाच कालावधी २२ आठवडय़ांचा असतो.
प्रवेश घेतलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला वेगवेगळ्या पथकांमध्ये समाविष्ट केले जाते. प्रशिक्षणाबरोबरच मदानी खेळ व अन्य क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सोयीसुविधा संस्थेत उपलब्ध आहेत.
० एन.डी.ए. – वर्षांतून दोनदा घेतली जाते.
० सी.डी.एस.ई. – वर्षांतून दोनदा घेतली जाते.
० १०+२ – वर्षांतून दोनदा घेतली जाते.
० जी.एस.ई.एस. -ग्रॅज्युएट स्पेशल एन्ट्री स्कीम.
० एन.सी.सी.- स्पेशल एन्ट्री इंडिअन नेव्हल अकादमी
० एन.ए.आय.सी.- नेव्हल आर्ममेंट इन्स्पेक्शन सेंटर.
० लॉ कॅडर – सनदी कायदा १९६१ च्या नियमांप्रमाणे कायद्याचे पदवीधर.(कमीत कमी ५५ % गुण)
० लॉजिस्टिक्स कॅडर – लॉजिस्टिक्स एन्ट्री
० एक्झिक्युटिव्ह जनरल सíव्हस – बी.ई/ बी.टेक (कोणत्याही शाखेतून) ६० % गुणांसह
० एस.एस.सी. हायड्रोराफी – शॉर्ट सíव्हस कमिशन इन हायड्रोराफी.
० एस.एस.सी. इन्फम्रेशन टेक्नोलॉजी- टेक्निकल ग्रॅज्युएट इन इन्फम्रेशन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी रिलेटेड ब्रान्चेस
० यू.ई.एस.- युनिव्हर्सटिी एन्ट्री स्कीम
कन्नूर, केरळ येथील २४५२ एकर जागेत विस्तारलेल्या या संस्थेला अरबी समुद्राचे सान्निध्य लाभले आहे. या प्रशिक्षण संस्थेचे भौगोलिक स्थान नौदल प्रशिक्षणाला अनुकूल आहे. या प्रशिक्षणातूनच परकीय सागरी आक्रमणापासून नसíगक आपत्तींपासून देशवासीयांचे रक्षण करणारे सागरी योद्धे घडवले जातात.

ऑफिसर्स ट्रेिनग अकादमी
सध्या भारतात चेन्नई आणि गया या दोन ठिकाणी ऑफिसर्स ट्रेिनग अकादमी चालवल्या जातात. भारतीय भूदलाच्या शॉर्टसíव्हस कमिशनसाठी निवड झालेल्या स्त्री-पुरुष उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे काम येथे केले जाते.
भविष्यात नेतृत्व घडणीसाठी आवश्यक असणारे सर्व गुण तसेच नतिक मूल्ये, शारीरिक, मानसिक कणखरपणा, धाडसी आणि विजिगीषू वृत्ती या गोष्टी प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांच्या अंगी बाणवल्या जातात.
संस्थेतील प्रशिक्षणाद्वारे महत्त्वाकांक्षी, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे योद्धे घडवले जातात. देशाच्या सीमांचे रक्षण करण्याचे, देशांतर्गत सुरक्षा सांभाळण्याचे आणि नसíगक आपत्तींच्या काळात देशात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशिक्षण ४९ आठवडय़ांच्या काळात दिले जाते. या प्रशिक्षण संस्थांतून पुरेशी संगणक व्यवस्थाही उपलब्ध आहे.
येथील स्त्री-पुरुष प्रशिक्षणार्थीकडून शिस्तपालनाला प्राधान्य दिले जाते. चेन्नई आणि गया या दोन्ही प्रशिक्षण संस्थांतून विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक सर्व सुखसोयी उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी पात्रता –
० एस.एस.सी.(टेक्.) पुरुष – भारतीय भूदल.
० एस.एस.सी.(टेक्.) स्त्रिया – भारतीय भूदल.
० सी.डी.एस.ई.- वर्षांतून दोनदा घेतली जाते.
० १०+२ टी.ई.एस.- टेक्निकल एन्ट्री स्कीम.
० जज्ज अ‍ॅडव्होकेट जनरल (पुरुष)- मेल लॉ ग्रॅज्युएट.
० जज्ज अ‍ॅडव्होकेट जनरल (स्त्रिया)- फिमेल लॉ ग्रॅज्युएट.
० शॉर्ट सíव्हस कमिशन वुमेन (एन.सी.सी.) एन्ट्री – एन.सी.सी. स्पेशल एन्ट्री वुमेन
७५० एकर जागेत विस्तारलेल्या आणि आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त अशा या चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेिनग अकादमीत योद्धे तयार होतात.
बिहारच्या गया, पहारपूर येथे २०११ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ऑफिसर्स ट्रेिनग अकादमीचे ब्रीदवाक्यच मुळी ‘शौर्य, ज्ञान, संकल्प’ आहे.

अनुवाद – गीता सोनी