राज्याला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग अशी विक्रीकर विभागाची ओळख सर्वश्रुत आहे. राज्य लोकसेवा आयोगाद्वारे विक्रीकर विभागातील कर सहाय्यक (गट ’क’), विक्रीकर निरीक्षक (गट ’ब’ अराजपत्रित) आणि सहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट ’अ’ राजपत्रित) या तीन पदांकरता या परीक्षेद्वारे निवड केली जाते. त्यापकी कर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक पदांसाठी स्वतंत्र परीक्षेद्वारे तर सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी राज्यसेवा परीक्षेद्वारे निवडप्रक्रिया राबवली जाते. आयोगातर्फे २०१५ साली आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार विक्रीकर निरीक्षक २०१४ ही परीक्षा पार पडली आहे. विक्रीकर निरीक्षक २०१५ परीक्षा शासनाच्या मागणीपत्रकाअभावी वेळापत्रकानुसार होऊ शकली नाही. अलीकडेच आयोगाने २०१६ साली होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. उमेदवारांनी अभ्यासाचे नियोजन या वेळापत्रकाच्या आधारे करावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा