यूपीएससी परीक्षेतील भूगोल या घटकाचा अभ्यास करण्यासाठी कोणते संदर्भग्रंथ उपयुक्त ठरतात, याचा वेध घेणारा लेख-

आजच्या लेखामध्ये भूगोल या विषयाचा परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी नेमक्या कोणत्या संदर्भग्रंथांचा उपयोग करावा लागतो, तसेच ‘एनसीईआरटी’च्या (NCERT) नेमक्या कोणत्या इयत्तेच्या पुस्तकांचा उपयोग परीक्षेच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरू शकतो, याची चर्चा गतवर्षी विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे करुयात. भूगोल या विषयाचे अनेक संदर्भग्रंथ बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याच्या जोडीला ‘एनसीईआरटी’च्या भूगोल या विषयाच्या क्रमिक पुस्तकांचाही उपयोग या विषयाची तयारी करण्यासाठी होतो. यूपीएससीने ‘भारत व जगाचा भूगोल’ असे अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेले आहे, ज्यामुळे भारताचा भूगोल तसेच जगाचा भूगोल यांसारख्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी परीक्षाभिमुख माहिती देणाऱ्या संदर्भग्रंथांची योग्य निवड करावी लागते.

education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
atal setu traffic declined
विश्लेषण : अटल सेतूकडे वाहनचालकांची पाठ? वाहनांची संख्या रोडावली का?

सर्वप्रथम भूगोल या विषयाचे मूलभूत ज्ञान प्राप्त करण्यासाठी ‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकांचा वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरते. नेमक्या कोणत्या इयत्तेच्या पुस्तकांचा वापर करावा लागतो हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढे असतो. तसे पाहता इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व पुस्तकांचा वापर करावा लागतो, पण मुख्य परीक्षेच्या दृष्टीने Contemporary India (STD-IX,X), Fundamentals of Physical Geography (XI), Indian Physical Environment (XI), Fundamentals of Human Geography (XII), India- People and Economy (XII)इत्यादी पुस्तकांचा वापर उपयुक्त ठरतो, ज्यामुळे भूगोल या विषयाची तोंडओळख होण्यास मदत होते. ‘एनसीईआरटी’ची पुस्तके अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेली असल्यामुळे हा विषय समजणे तितकेसे कठीण जात नाही व परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी या विषयाची मूलभूत माहिती आपल्याला मिळते.

उपरोक्त नमूद केलेली पुस्तके शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली असल्यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने र्सवकष आणि सखोल तयारी करण्यासाठी आपल्याला ‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकाबरोबर बाजारात उपलब्ध असणाऱ्या संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. बाजारात या विषयाचे अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. नेमक्या कोणत्या संदर्भग्रंथाचा परीक्षेच्या दृष्टीने अधिक फायदा होतो हा निकष संदर्भग्रंथ निवडीमध्ये महत्त्वाचा ठरतो, तसेच या विषयाची विभागणी साधारणत: दोन घटकांत आहे; पहिला घटक प्राकृतिक भूगोल आणि दुसरा घटक मानवी भूगोल हे होय. या दोन्ही घटकांवर बाजारात स्वतंत्ररीत्या अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. या घटकाचा अभ्यास करण्यासाठी पुढे नमूद केलेल्या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो – Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India­   Comprehensive Geography ( by D.R. Khullar), World Geograhy (by Majid Husain), World Regional Geography (Tikha,Bali,Sekhaon). या संदर्भग्रंथांचा वापर हा भूगोल विषयाची र्सवकष आणि सखोल तयारी करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.

उपरोक्त नमूद केलेल्या संदर्भग्रंथांमध्ये या सर्व घटकांची अधिक सविस्तर पद्धतीने माहिती मिळते, पण या संदर्भग्रंथांचा वापर हा या विषयाच्या अभ्यासक्रमाचे विभाजन घटकनिहाय पद्धतीने करून केल्यास अधिक फायदा होतो, कारण ‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकांचे वाचन केल्यामुळे या विषयाचे एक मूलभूत ज्ञान आपल्याला मिळते, तसेच याच्या जोडीला गतवर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणाचा आधार घेतल्यास अधिक उपयुक्तरीत्या उपरोक्त नमूद केलेल्या संदर्भग्रंथांचा वापर करता येतो, उदाहरणार्थ- २०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चिनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यांसारख्या प्रदेशांत मोठय़ा प्रमाणात मर्यादित असतात, कारण’, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. थोडक्यात, या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी आपणाला उष्णदेशीय चक्रीवादळे यांची सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे, तसेच हा प्रश्न जगातील तीन विविध प्रदेशांच्या प्राकृतिक रचनेशी संबंधित आहे. त्यामुळे नेमके कोणते प्राकृतिक घटक यासाठी जबाबदार आहेत याचीही माहिती असणे क्रमप्राप्त ठरते. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या जवळपास सर्व संदर्भग्रंथांचा वापर करता येतो. तसेच मुख्य परीक्षेचा विचार करता भारताचा भूगोल या घटकावर  सर्वाधिक प्रश्न विचारण्यात येतात, ज्यामध्ये भारताच्या प्राकृतिक, लोकसंख्या, सामाजिक व आíथक घटकांशी संबंधित प्रश्न असतात. या सर्व घटकांची सविस्तर माहिती देणारा ग्रंथ India Comprehensive Geography (by D.R. Khullar) हा आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने भारताच्या भूगोलाच्या अभ्यासावर सर्वाधिक भर द्यावा लागतो. या व्यतिरिक्त ‘जगाचा भूगोल’ या घटकावरही प्रश्न विचारले जातात. उदारणार्थ- २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये- महासागरीय प्रवाहाच्या उगमासाठी जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा, तसेच हे प्रवाह प्रादेशिक हवामान, मासेमारी आणि जलवाहतूक यावर काय प्रभाव टाकतात – असा प्रश्न विचारण्यात आलेला होता व हा प्रश्न प्राकृतिक आणि आíथक या दोन्ही पलूंचा आधार घेऊन विचारण्यात आलेला होता. यासाठी उपरोक्त नमूद केलेल्या Certificate physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), World Geograhy (by Majid Husain), World Regional Geography (Tikha,Bali,Sekhaon) इत्यादी संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो.

याचबरोबर या विषयाशी संबंधित चालू घडामोडींचाही अभ्यास करावा लागतो, ज्यामध्ये मुख्यत्वे आíथक आणि सामाजिक भूगोल तसेच प्राकृतिक घटकाचा समावेश होतो व यासाठी आघाडीची वर्तमानपत्रे, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ यांसारख्या मासिकांचा वापर उपयोगाचा ठरतो. उदाहरणार्थ, २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यामध्ये दिल्लीमधील वायू प्रदूषण हे मुंबई व कोलकाता या  महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे? असा प्रश्न विचारलेला होता, जो पर्यावरण आणि हवामान संबंधित होता आणि याचा चालू घडामोडींशी संबंधही जोडलेला होता. यासाठी उपरोक्त नमूद केलेली वर्तमानपत्रे आणि मासिकांचा उपयोग करता येतो. थोडक्यात, उपरोक्त नमूद केलेल्या ‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकांचा वापर तसेच संदर्भग्रंथांचा वापर करून भूगोल या विषयाची परीक्षाभिमुख तयारी करता येते.

Story img Loader