यूपीएससीच्या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीनही टप्प्यांची सविस्तर माहिती-
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्वपरीक्षा यंदा ७ ऑगस्ट २०१६ रोजी आहे. या परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी अनेकदा विद्यार्थी अभ्यासाची योजना बनवतात हे खरे, मात्र त्याचे काटेकोर पालन करीत नाहीत. केवळ अभ्यासाची योजना आखणे महत्त्वाचे नाही तर आखलेल्या योजनेनुसार मेहनत करणारा विद्यार्थीच परीक्षेचा गांभीर्याने विचार करतो. नागरी सेवा परीक्षेची प्रक्रिया सुमारे वर्षभर चालते. या कालावधीत उमेदवाराने स्वत:चे विचार सकारात्मक ठेवून यशासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.
पूर्वपरीक्षा :
पूर्वपरीक्षेची तयारी मुख्य परीक्षेसोबतच केली जाते. पण पूर्वपरीक्षेत काही गोष्टी मुख्य परीक्षेपेक्षा वेगळ्या असतात. पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन व कलचाचणी असे दोन पेपर असतात. दोन्हीही पेपर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. २०१५ मधील अधिसूचनेनुसार कलचाचणी हा पेपर पात्रता स्वरूपाचा करण्यात आला आहे. या दुसऱ्या पेपरमध्ये
३३ टक्केगुण म्हणजे ६६ गुण मिळवणे आवश्यक आहे. सामान्य अध्ययन आणि कलचाचणी या दोन्ही पेपरमधील प्रश्न इंग्रजी व िहदी या दोन भाषांमध्ये दिलेले असतात. २००७ पासून पूर्वपरीक्षेस निगेटिव्ह मार्किंग लागू झाले आहे. चुकीच्या प्रत्येक उत्तरादाखल मिळालेल्या गुणामधून १/३ (०.३३ किंवा ३३ टक्के) इतके गुण वजा केले जातात.
पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम
सामान्य अध्ययन पेपर १ :
- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी.
- भारतीय इतिहास व राष्ट्रीय चळवळ
- भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आíथक भूगोल
- भारतीय राज्यव्यवस्था व शासन
- आíथक व सामाजिक विकास
- पर्यावरणीय परिस्थिती सामान्य विज्ञान
कलचाचणी पेपर २ :
- आकलन आणि इंग्रजी भाषा आकलन क्षमता
- व्यवस्थापकीय अभिवृत्ती परीक्षण
- ताíकक क्षमता व विश्लेषण क्षमता
- सामान्य बौद्धिक क्षमता
- पायाभूत अंकगणित
- माहितीचे अर्थातरण
या अभ्यासक्रमनिहाय आपली अभ्यासाची योजना आखायला हवी. कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात, याचे विश्लेषण अभ्यासणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवता येते. मागील पाच वर्षांचे विश्लेषण पुढील तक्त्यामध्ये दिले आहे-
सामान्य अध्ययन पेपर १ :
पूर्वपरीक्षेचा दुसरा पेपर हा पात्रता स्वरूपाचा असला तरी त्याची गांभीर्यपूर्वक तयारी करणे आवश्यक आहे. नियमितपणे सराव केल्यास परीक्षा कक्षामध्ये हा पेपर अवघड वाटणार नाही. यामध्ये कॉम्प्रिहेन्शन व लॉजिकल रीझिनगवर जास्त प्रश्न विचारले जातात. मागील वर्षीच्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेत सराव पेपर सोडवायला हवे.
मुख्य परीक्षा :
मुख्य परीक्षा ही लेखी परीक्षा असते. दीघरेत्तरी स्वरूपाची व बहुविध प्रश्नांनी युक्त अशी ही परीक्षा संपूर्णत: वर्णनात्मक पद्धतीची असते. भारतीय भाषा आणि इंग्रजी हे दोन विषय पात्रता स्वरूपाचे आहेत. या विषयांचे गुण अंतिम निकालासाठी समाविष्ट केले जात नाहीत. मुख्य परीक्षेत एकूण ९ प्रश्नपत्रिका असतात. दोन भाषांचे पेपर वगळता ७ पेपरचे गुण व मुलाखतीचे गुण अंतिम निकालासाठी एकत्रितपणे विचारात घेतले जातात.
- सर्व पेपर्स वर्णनात्मक पद्धतीने असतात व प्रत्येक पेपरसाठी तीन तासांचा कालावधी देण्यात येतो.
- उमेदवारांकडे असलेली माहिती आणि त्यांची स्मरणशक्ती जोखण्यापेक्षा उमेदवाराची आकलनशक्ती आणि बौद्धिक क्षमता तपासणे, हा मुख्य परीक्षेचा उद्देश असतो.
- एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणत्याही ‘विशेष’ (Specialised) अभ्यासाशिवायही उत्तरे देऊ शकेल असे सामान्य अध्ययनाच्या प्रश्नांचे स्वरूप असते.
मुलाखत :
तुमचा बायोडेटा हाच तुमचा मुलाखतीचा अभ्यासक्रम आहे. मुख्य परीक्षेच्या अर्जामध्ये नमूद केलेली व्यक्तिगत माहिती आणि तुमचा बायोडाटा हीच मुलाखतीची सर्वसाधारण चौकट असते. बायोडेटामध्ये नोंदवलेल्या प्रत्येक शब्दाचा सूक्ष्म अभ्यास करा. तुमच्या छंदांवर विशेष लक्ष असू द्या. अनेकदा छंदाविषयी प्रश्न विचारले जातात. मुलाखत तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासाची चाचणी आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेद्वारे तुमच्या ज्ञानाची परीक्षा झालेली असते. मुलाखतीतून प्रशासकीय पदांसाठी तुम्ही किती योग्य आहात हे तपासले जाते. व्यक्तिमत्त्वाचा विकास हा काही दिवसांचा अभ्यास नसतो, ती एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले पाहिजेत. मुलाखतीमध्ये विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी उमेदवारांनी पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून केला पाहिजे.
तयारीच्या काळात या गोष्टी टाळाव्यात..
- यश आणि अपयशाची चिंता न करता चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करा.
- आपल्या सभोवताली नकारात्मक वृत्तीचे लोक असतात. अशा नकारात्मक विचारांपासून व व्यक्तींपासून दूर राहणे हिताचे.
- सकारात्मक विचार, स्वतवर विश्वास आणि
- स्मार्ट स्टडी’वर भर द्या.
- कोणत्याही विषयाची तयारी करताना संदर्भ पुस्तकांची निवड मार्गदर्शकांच्या किंवा ज्येष्ठ उमेदवारांच्या सल्ल्याने करावी.
- सराव पेपर सोडवून आपण स्पध्रेत कुठे आहोत, हे तपासत राहणे आणि मार्गदर्शकांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असते.