इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, दिल्ली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राजधानी दिल्लीमध्ये असलेल्या इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) या संशोधन संस्थेची स्थापना अगदी अलीकडे म्हणजे १९७७ साली झालेली आहे. या संस्थेचे तेव्हाचे नाव सेंटर फॉर बायोकेमिकल टेक्नॉलॉजी असे होते. नावाप्रमाणेच जैवरसायनशास्त्र हा संस्थेच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. मात्र नंतर संस्थेने आपल्या संशोधनाचा रोख जिनॉमिक्स आणि इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी या विषयांकडे वळवला. सध्या आय.जी.आय.बी. या नावाने ओळखली जाणारी ही संस्था वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर) संलग्न आहे.
- संस्थेविषयी
इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी ही संस्था जिनॉमिक्स आणि एकात्मिक जैवविज्ञान (इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी) या विषयांमध्ये संशोधन करणारी सीएसआयआरची देशातील एक प्रमुख आणि महत्त्वाची संशोधन संस्था आहे. जीवशास्त्रामध्ये होणाऱ्या मूलभूत संशोधनातून विकसित झालेल्या संकल्पनांचा वैद्यकीय व्यवसायासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून वापर करणे, या हेतूने संस्था काम करते. संशोधनाबरोबरच ती संशोधन आणि विकास सल्लागार संस्था म्हणूनही काम करते. या संशोधन संस्थेमध्ये प्रामुख्याने जिनॉमिक्स, मॉलिक्युलर मेडिसिन, बायोइन्फम्रेटिक्स, प्रोटिओमिक्स आणि पर्यावरण जैवतंत्रज्ञान या विषयांतील संशोधन केले जाते. संस्थेचे दिल्लीमध्ये एकूण दोन कॅम्पस आहेत. दोन्हींपकी दिल्ली विद्यापीठाच्या आवारात ज्युबिली हॉलच्या विरुद्ध दिशेला असलेला नॉर्थ कॅम्पस हा जुना कॅम्पस आहे तर नुकताच स्थापन झालेला साऊथ कॅम्पस हा मथुरा मार्गावरील सुखदेव विहार येथे आहे.
- संशोधनातील योगदान
आयजीआयबी आपल्या सर्व संशोधन विषयांपकी जिनॉमिक्स आणि मॉलिक्युलर मेडिसिन या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. सध्या तिथल्या संशोधनाचे हे दोन प्रमुख विषय असून त्यामध्ये मग इतर संशोधन संस्थांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प राबवणे चालू आहे. या संशोधन प्रकल्पांमध्ये भारतीय जनुकांच्या विविधतेपासून ते गुंतागुंतीच्या मानवी रोगांची जनुकीय रचना इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. याबरोबरच, स्किझोफ्रेनिया, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह आणि अन्य जटिल विकार इत्यादी बाबींवरदेखील विपुल संशोधन केले जाते. विविध मानसिक व मेंदूशी संबंधित अनेक आजारांवर संशोधन करत असतानाच आयजीआयबीने नेहमी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरली आहे.
ही आंतरविद्याशाखीय संशोधन संस्था असून इथे प्रमुख सहा संशोधन विभाग वा शाखा आहेत. वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्राची सांगड घालणारे हे विभाग म्हणजे जिनॉमिक्स अँड मॉलिक्युलर मेडिसिन, रेस्पिरेटरी डिसीज बायोलॉजी, जीनोम इन्फॉम्रेटिक्स अँड स्ट्रक्चरल बायोलॉजी, एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल बायोटेक्नॉलॉजी, केमिकल अँड सिस्टम्स बायोलॉजी, आयुर्जेनॉमिक्स. या संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) नेहमीच चालना दिलेली आहे. म्हणूनच दरवर्षी संस्थेकडून कित्येक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित केले जातात. याशिवाय देश-विदेशातील विविध विद्यापीठांबरोबर आयजीआयबी परस्पर सहकार्याने अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे.
- विद्यार्थ्यांसाठी संधी
सीएसआयआरच्या सूचनेनुसार या संशोधन संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. तसेच पदवीधर विद्यार्थी लघुकालीन संशोधन प्रकल्पांसाठी येथे अर्ज करू शकतात. त्यामुळेच आयजीआयबी संशोधनाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाला पुरेसा वाव देण्याचे कार्यही करत आहे. ही संस्था देशातील व परदेशातील अनेक विद्यापीठांशी पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. भारतातील विविध विद्यापीठांमध्ये जिनॉमिक्स वा अनुवंशिकता शास्त्रासारख्या विषयांमध्ये पीएचडीचे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी येथे नेहमी येत असतात. कारण त्यांना आपल्या संशोधनामध्ये संस्थेतील तज्ज्ञ व अनुभवी संशोधकांचे मार्गदर्शन हवे असते. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या नेट, गेट वा तत्सम परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ/ एसआरएफ विद्यार्थी इथे पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. या संशोधक विद्यार्थ्यांना देश-विदेशातील अनेक कार्यशाळांना पाठवून त्यांचे प्रकल्प सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
संपर्क
- कॅम्पस १ – इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, ज्युबिली हॉलजवळ, मॉल मार्ग दिल्ली-११०००७. दूरध्वनी +९१ ११२७ ००२२००/२०१
- कॅम्पस २ – इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, साउथ कॅम्पस, मथुरा मार्ग, सुखदेव विहार बस डेपोच्या विरुद्ध दिशेला, नवी दिल्ली ११००२५. दूरध्वनी +९१ ११ २९८७९४८७ / २९८७९४८८.
- इमेल – director@igib.res.in , rsg@igib.res.in
- संकेतस्थळ -https://www.igib.res.in/
– प्रथमेश आडविलकर
itsprathamesh@gmail.com